CID Maharashtra Bharti 2025 : अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग (CID), महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयाचे आस्थापनेवरील रिक्त पदे भरावयाची आहेत. त्याकरिता नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीची जाहिरात पोलीस उपमहानिरीक्षक (प्रशासन) अपोमसं, गुअवि, म.राज्य द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, भरती बद्दलची इतर आवश्यक माहिती, अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
CID Maharashtra Bharti 2025 : The office of Additional Director General of Police, Criminal Investigation Department (CID), Maharashtra State, Pune has vacant posts to be filled. Applications are invited from interested candidates who fulfill the mentioned eligibility criteria.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : पोलीस उपमहानिरीक्षक (प्रशासन) अपोमसं, गुअवि, म.राज्य द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : पोलीस / सुरक्षा विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 28,000 रूपये मानधन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरती कालावधी : ही पदे पूर्णतः कंत्राटी पद्धतीने भरावयाची आहेत.
◾वयोमर्यादा : या पदासाठी उमेवाराचे वय १२ फेब्रुवारी २०२५ रोजी ६० वर्षापेक्षा जास्त नसेल.
◾पदाचे नाव : विधी अधिकारी (गट ब).
◾शैक्षणिक अर्हता : उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कायदयाचा पदवीधर असेल तो सनदधारक असेल.
◾अनुभव :
अ) विधी अधिकारी (गट-ब) या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक राहील.
ब) उमेदवारास गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक प्रशासनिय अशा सर्व प्रकारच्या कायदयाची स्थिती तथा विभागीय चौकशी इ. बाबतीत ज्ञान संपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल,
क) उमेदवारास मराठी, हिंदी इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असले पाहिजे.
◾एकूण पदे : 02 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : पुणे. (Jobs in Pune)
◾निवड प्रक्रिया :
1) लेखा परीक्षा – ५० गुण.
2) मुलाखत – २५ गुण.
◾पदासाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवाराने हे सुनिश्चित केले पाहिजे की तो / तिने जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पात्रता निकष आणि इतर अटी पूर्ण केल्या आहेत.
◾उमेदवाराने www.mahacid.gov.in या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेला विहीत नमुन्यातील अर्ज परिपूर्णरित्या भरून अंतिम तारीख पर्यंत कार्यालयीन वेळेत (सकाळी १०.०० ते सायंकाळी ०६.१५ वा.) दिलेल्या पत्त्यावर पोहोचतील या बेताने पाठवावेत.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 12 फेब्रुवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे विद्यापीठ चौक, पाषाण रोड, मॉर्डन लॉ कॉलेज शेजारी चव्हाणनगर, पुणे-४११००८.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.