
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयाचे आस्थापनेवर विधी अधिकारी (गट-ब) २ पदे मंजूर आहेत. विधी अधिकारी (गट-ब) चे २ पदे ११ महिन्याच्या करारावर कंत्राटी पध्दतीने भरावयाची आहेत. त्याकरीता www.mahacid.gov.in या संकेतस्थळावर सदरची विस्तृती स्वरुपातील जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. या पदाकरिता नमूद अटी शर्ती व शैक्षणिक पात्रता पुर्ण करीत असलेल्या उमेदवारांकडुन ११ महिन्यांकरीता पूर्णतः कंत्राटी पध्दतीने भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
इच्छुक उमेदवारांची सोबत दिलेल्या विहित नमुन्यातील अर्ज लिफाफ्यात घालुन लिफाफ्यावर उजव्या बाजुला ठळक अक्षरात विधी अधिकारी (गट-ब) पदासाठी अर्ज असे स्पष्ट नमुद करुन दोन रंगीत फोटो अर्जासोबत जोडुन अर्ज दिनांक १२ फेब्रुवारी २०२५ रोजी सायं ०६.१५ वा. पर्यंत अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे विद्यापीठ चौक, पाषाण रोड मॉर्डन लॉ कॉलेज शेजारी चव्हाणनगर, पुणे ४११००८ या पत्यावर पोहोचतील अशा बेताने पाठवावेत. तसेच अर्जात त्यांचा दुनध्वनी, भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल आयडी यांचा स्पष्टपणे उल्लेख करावा. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचा.