सिडको मध्ये करिअर करण्याची उत्तम संधी! | CIDCO Bharti 2025

CIDCO Bharti 2025 : सिडकोतर्फे सिडको मधील रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. चांगल्या वेतनाची नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात सिडको (CIDCO) महामंडळ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
CIDCO Bharti 2025 : CIDCO is inviting applications online to fill the vacant posts in CIDCO. Eligible and interested candidates should submit their applications.
⚠️ महत्वाचे : या लेखात दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : सिडको (CIDCO) महामंडळ द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : 41,800 ते 1,32,300/- रुपये पर्यंत. (प्रत्येक पदांचे मासिक वेतन वेगवेगळे आहे.)
अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 43 वर्ष.
भरती कालावधी : सदर पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीस 1 वर्षाचा परिविक्षाधीन कालावधी लागू राहील.
पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
▪️सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य) : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच उमेदवाराला ज्या क्षेत्रात काम करावे लागेल त्या क्षेत्रातील स्पेशलायझेशन.
▪️क्षेत्राधिकारी (सामान्य) : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा त्याच्या समकक्ष.
अर्ज शुल्क :▪️खुला प्रवर्ग – 1180/- रुपये.
▪️राखीव प्रवर्ग / माजी सैनिक/दिव्यांग माजी सैनिक – 1062/- रुपये.
एकूण पदे : 029 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.
◾पात्र उमेदवारांनी सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य) व क्षेत्राधिकारी (सामान्य) या पदांच्या सरळसेवा भरतीसाठी https://ibpsonline.ibps.in/cidcogjul24/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावेत.
◾उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन (Online) पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने अर्ज करतांना शैक्षणिक कागदपत्रे, अन्य प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक नाही. तथापि ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्यांच्या पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक आहे. ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरतांना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहील्यास व त्यामुळे भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. याबाबत उमेदवारास तक्रार करता येणार नाही. ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती बदलता येणार नाही. जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व अटी तसेच शैक्षणिक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, शिथीलीकरण इत्यादी पात्रता तपासूनच उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरावा.
◾उमेदवारांची परीक्षा त्यांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या गृहीत पात्रतेनुसार कोणतीही कागदपत्रे पूर्वतपासणी / छाननी न करता घेतली जाणार असल्यामुळे या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवाराला निवडीबाबतचे कोणतेही हक्क राहणार नाहीत. कागदपत्रांच्या पूर्ण छाननीनंतरच उमेदवाराची पात्रता निश्चित करण्यात येईल.
◾निवडीचे निकष – गुणवत्ता यादीत येण्याकरीता उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. विहित अर्हता/अटी शर्ती पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांची सदर परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे विहित आरक्षणानुसार निवड यादी बनविण्यात येईल.
◾सदर पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीस 1 वर्षाचा परिविक्षाधीन कालावधी लागू राहील.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 11 जनवरी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


error: Content is protected !!