
शुध्दीपत्रक | येथे क्लीक करा |
pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा (मोबाईल मधून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डेस्कटॉप सेटिंग ऑन करून मोबाईल आडवा करा) |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
सिडको मध्ये नवीन पदांची भरती सुरू झाली आहे. सिडको महामंडळाने दि.09.12.2023 रोजी लेखा लिपिक या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. तसेच, दि.20.12.2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या शुद्धिपत्रकाद्वारे सदर जाहिरातीमध्ये प्रसिद्ध केलेल्या रिक्त पदांच्या आरक्षणात बदल करण्यात आल्याचे कळविण्यात आले होते व इतर मागास वर्ग (OBC), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) व खुल्या/ अराखीव प्रवर्गातील (OPEN) उमेदवारांना त्यांचा प्रवर्ग बदलून एसईबीसी (SEBC) प्रवर्गातून अर्ज सादर करण्याकरीता लिक उपलब्ध करुन देण्यात आली होती.
तसेच, नव्याने अर्ज सादर करु इच्छिणाऱ्या उमेदवारांकरीता व यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना दुसऱ्या प्रवर्गातून अर्ज सादर करावयाचा असल्यास नजिकच्या काळात ऑनलाईन लिंक सिडको संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल असे कळविण्यात आले होते. अन्वये, यापूर्वी अर्ज सादर केलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या सादर केलेल्या अर्जातील प्रवर्ग बदलावयाचा असल्यास अशा उमेदवारांना नव्याने अर्ज सादर करावा लागेल. उदाहरणार्थ यापूर्वी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) या प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या ज्या उमेदवारांना त्यांचा प्रवर्ग बदलून इमाव (OBC) किंवा अराखीव (OPEN) प्रवर्गातून अर्ज सादर करावयाचा असल्यास अशा उमेदवारांना https://ibpsonline.ibps.in/cidcoacjun23/ सदर लिकद्वारे दि. 28.01.2025 ते दि. 07.02.2025 या कालावधीत अर्ज सादर करता येणार आहे. सदर उमेदवारांनी खालील बाबींची नोंद घ्यावीः-
नवीन अर्ज सादर करतेवेळी, नव्याने परीक्षा शुल्क भरावे लागेल व याआधी भरणा करण्यात आलेल्या परीक्षा शुल्काचा परतावा मिळणार नाही. एकापेक्षा अधिक अर्ज सादर केलेल्या उमेदवारांच्या अर्जापैकी त्यांनी परीक्षाशुल्क भरुन सादर केलेला शेवटचा अर्ज ग्राह्य धरण्यात येईल. सिडको महामंडळातर्फे लेखा लिपिक या पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून नव्याने अर्ज सादर करु इच्छिणाऱ्या उमेदवारांना https://ibpsonline.ibps.in/cdidcoacjun23/ सदर लिकद्वारे दि. 28.01.2025 ते दि. 07.02.2025 या कालावधीत अर्ज सादर करता येणार आहे. नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी दि. 09.12.2023 रोजी प्रसिद्ध केलेली जाहिरात तसेच लेखा लिपिक या पदासाठी www.cidco.maharashtra.gov.in या सिडको संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या जाहिरसुचना तसेच शुद्धिपत्रकांचे अवलोकन करावे.