महाराष्ट्र शासन : न्यायदंडाधिकारी कार्यालय भरती 2025 | वेतन – 15,000 ते 47,600 रूपये | CMM Mumbai Bharti 2025

CMM Mumbai Bharti 2025 : मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालय यांच्या आस्थापनेवरील सफाईगार / मेहतर या पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. भरती मध्ये उमेवारांची निवड सूची आणि प्रतिक्षा सूची तयार करण्यात येणार आहे. जे उमेदवार दिनांक 16 मार्च 2025 रोजी पात्रतेचे निकष पूर्ण करतात, त्यांच्याकडून विहित नमुन्यात दिनांक 17 मार्च 2025 ते 01 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचा नमुना व सविस्तर pdf जाहिरात खाली दिली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. Pdf जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
CMM Mumbai Bharti 2025 : Candidates will be selected for the posts of Sweeper/Sweeper in the establishment of the Chief Judicial Magistrate's Court. A selection list and a waiting list of candidates will be prepared in the recruitment. Applications are invited from the candidates who fulfill the eligibility criteria on 16th March 2025 in the prescribed format from 17th March 2025 to 01st April 2025.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : न्यायदंडाधिकारी कार्यालय व्दारे अधिकृत भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासनने मान्यता दिल्या नंतर ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
पदाचे नाव : सफाईगार / मेहतर.
शैक्षणिक पात्रता : उमेदवार कमीत कमी 4थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 7वी / 10वी / 12वी / पदवीधर किंवा उच्च शिक्षण घेतलेले उमेदवारही अर्ज दाखल करु शकतात. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 15,000 ते 47,600 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत pdf जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली उपलब्ध आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन. नोंदणीकृत डाकेद्वारे (RPAD) किंवा शिघ्र डाक सेवा पोच पावतीसह (Speed Post) द्वारेच मागविण्यात येत आहेत. कोणत्याही परिस्थितीत हस्तप्रेक्षणाद्वारे म्हणजेच By Hand अर्ज स्विकारले जाणार नाहीत
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष दरम्यान वय असलेले उमेदवार पात्र ठरतील.
भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
एकूण पदे : 07 (सात) जागा.
नोकरी ठिकाण : मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालय, एस्प्लनेड, मुंबई.
निवड प्रक्रिया :
१) चापल्य व साफसफाईच्या परिक्षा सफाईगार/मेहतर पदासाठी अल्पसुचीत नमुद उमेदवारांची २० गुणांची चापल्य व साफसफाई कामाची मूल्यमापन परिक्षा घेण्यात येईल.
२) चापल्य व साफसफाई परिक्षेमध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे, काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे, जाहिरातीमध्ये नमुद केलेल्या पदांच्या संख्येच्या ३ पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
कामाचे स्वरूप :
१) निवड झालेल्या उमेदवारांची जेथे नियुक्ती केली जाईल तेथील न्यायालयीन इमारतीची, इमारत परिसराची व सर्व नोकरी प्रसाधन गृहांची नियमित स्वच्छता व साफसफाई करणे आणि निगा राखणे.
२) मा. मुख्य न्यायाधीश तसेच इतर न्यायिक अधिकारी व आस्थापना अधिकारी यांच्या निर्देशानुसार आवश्यक ती सर्व कामे करणे. पदाला अनुसरून सर्व कर्तव्ये पार पाडणे बंधनकारक आहे.
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख : ०१/०४/२०२५ सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत राहील.
◾मुदतीनंतर प्राप्त झालेल्या तसेच विहित नमुन्यात न केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◾अर्ज विहित नमुन्यात व ऑफलाईन पध्दतीने नोंदणीकृत डाकेद्वारे (RPAD) किवा शिघ्र डाक सेवा पोच पावतीसह (Speed Post) द्वारेच करावयाचा आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा. प्रबंधक, मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालय, महापालिका मार्ग, एस्प्लनेड, मुंबई ४०० ००१.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!