Collector Office Bharti 2025 : नोकरी शोधताय? जिल्हाधिकारी कार्यालय द्वारे नवीन जागेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. रिक्त पदाची जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. अधिकृत जाहिरात कलेक्टर ऑफिस द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, pdf जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Collector Office Bharti 2025 : The Collector's Office has published an advertisement for a new post. A new recruitment has been announced to fill the vacant post. The official advertisement has been published by the Collector's Office.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागांत काम मिळविण्याची चांगली संधी.
◾पदाचे नाव : अधिकृत जाहिरात वाचा.
◾शैक्षणिक पात्रता : पदवीधर व इतर. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : 45,000 रुपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना मानधन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली पहा.
| 📑 Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
| 🧾 अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline)
◾भरती कालावधी : निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात, ।। महिन्याच्या कालावधीसाठी. (परिस्थती नुसार 11 महिन्यानंतर मुदतवाढी बाबत निर्णय घेण्यात येईल.)
◾पदाचे नाव : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी.
◾इतर आवश्यक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी / पदव्युत्तर पदवी (सामाजिक शाखे किंवा आपत्ती व्यवस्थापन)
◾अनुभव :
1) 3 वर्षांचा अनुभव त्यातील किमान 2 वर्ष आपत्ती व्यवस्थापनातील अनुभव असावा.
2) मराठी व इंग्रजी भाषाचे चांगले ज्ञान असणे इष्ट.
3) टिपणी लेखन, अहवाल लेखन यामध्ये विशेष प्राविण्य.
4) शासकीय कामाच्या अनुभवास विशेष प्राधान्य देण्यात येईल.
5) वरील बाबीचा पुर्तता होत असल्यास व प्रकल्प हाताळण्याचा पूर्वानुभव असल्यास अशा उमेदवाराचा सदर पदासाठी विचार केला जाईल.
◾एकूण पदे : 01.
◾अर्जदाराने अर्जासोबत खालील कागदपत्रांच्या शासकीय स्व-साक्षांकित केलेल्या प्रती जोडणे बंधनकारक आहे :
1) किमान शैक्षणिक अर्हता व त्यावरील शैक्षणिक अर्हता परिक्षा उत्तीर्ण असल्याचे गुणपत्रक व प्रमाणपत्र.
2) शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला.
3) 3 वर्षाचा अनुभव त्यातील किमान 2 वर्ष अनुभव आपत्ती व्यवस्थापनातील असल्याबाबत प्रमाणपत्र.
4) शासकीय कामाचा अनुभव असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र.
5) प्रकल्प हाताळण्याचा पुर्वानुभव असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र.
6) महाराष्ट्रातील रहिवाशी प्रमाणपत्र.
7) लहान कुटुंब असल्याचे प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे.
◾नोकरी ठिकाण : जिल्हाधिकारी कार्यालय (आस्थापना शाखा) बीड.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 05 जून 2025.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : आवक जावक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
