पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
नमूना अर्ज | येथे क्लीक करा |
सरकारी विभाग मध्ये नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परभणी द्वारे रिक्त झालेली पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये अधिक्षक (महिला) ही पदे भरली जाणार आहेत. फक्त रिक्त असलेले 01 पद भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अटी व नियम : प्राप्त अर्जाची छाननी करुन पात्र उमेदवारांना तोंडी मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल. उमेदवारांना मुलाखतीसाठी येण्या – जाण्याचा तसेच इतर खर्च स्वतःच भागवावा लागेल. तसेच अपात्र ठरलेल्या उमेदवारांस कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही किंवा कारण कळविले जाणार नाही, किंवा यासंदर्भात कोणतीही सबब ऐकूण घेतली जाणार नाही.
उमेदवारांना अर्जाच्या छाननीअंती मुलाखतीकरीता पात्र उमेदवारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईट www.parbhani.nic.in वर उपलब्ध करुन देण्यात येईल. जर मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यास वेळ प्रसंगी लेखी परिक्षा व मुलाखत घेतली जाईल. अर्जासोबत सहायक जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी यांचे नावे रु.500/- चा राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष (DD) नापरतावा म्हणून जोडणे बंधनकारक आहे.
अर्ज करणारा उमेदवार हा स्थानिक जिल्ह्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. उमेदवारांना निकालासंबधी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईट www.parbhani.nic.in वर उपलब्ध करुन देण्यात येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली pdf जाहिरात पहा.