pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
महाराष्ट्र शासन, महसुल व वन विभाग अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर, शासन महसुल व वन विभाग, यांचे निर्णय नुसार ‘विधी अधिकारी’ हे पद कंत्राटी पध्दतीने एका वेळी 11 महिन्याच्या कालावधीसाठी भरावयाचे असुन, त्याकरीता पात्र उमेदवारांकडून खालील अटी व शर्तीच्या अधीन राहुन विहीत नमुन्यात 10 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 35,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
जबाबदाऱ्या : शपथपत्राचा मसुदा तयार करणे व त्यास सक्षम प्राधिकाऱ्याची मान्यता घेवुन न्यायालयात विहीत मुदतीत सादर होईल, हे पाहणे. जिथे शासनाच्या विरोधात न्यायालयाने निकाल दिलेला आहे, अशा प्रकरणामध्ये न्यायालयाच्या निर्णयांचा अभ्यास करून तदनुषंगाने अपिल दाखल करण्याच्या संदर्भात उचित कार्यवाही करणे. अपिल प्रकरणे योग्य असल्यास व तसा निर्णय झाल्यास अपिलाचा मसुदा तयार करून तो संबंधीत सरकारी वकीलाकडे पाठविणे व अपिलाचा अंतिम निर्णय लागे पर्यंत पाठपुरावा करणे. वेळोवेळी जिल्हाधिकारी / शाखा प्रमुख इतर कोणत्याही सक्षम अधिकाऱ्यांनी विधी विषयक कामकाजाबाबत व नेमूण दिलेले कार्य विहीत मुदतीत पार पाडणे.
सदर जाहिरात व सदर पदाकरीता विहीत नमुन्यातील अर्ज, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र या कार्यालयाचे http//:chandrapur.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांनी विहीत नमुन्यातील अर्ज A4 आकाराच्या कागदावर एका बाजुस टंकलिखीत / संगणीकृत करून जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर या पत्त्यावर दिनांक 10/01/202 पर्यंत सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत सादर करावे. विहीत मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
निवड झालेल्या उमेदवाराने विहीत नमुन्यातील करारनामा करून देणे बंधनकारक आहे, करारनामा करून दिल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारास कंत्राटी पध्दतीने नेमणुककरीता असल्याचे आदेश देण्यात येईल. कंत्राटी पध्दतीने विधी अधिकारी या पदावर नेमणूक झालेल्या उमेदवारास त्यांचे नेमणुकीचे पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या पारा पाडाव्या लागतील. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.