10वी उत्तीर्ण उमेदवारांना ग्रामीण डाक जीवन विमात मध्ये नोकरीची संधी | Dak Vibhag Bharti 2025

Dak Vibhag Bharti 2025 : भारतीय डाक विभाग अंतर्गत ग्रामीण डाक जीवन विमा (RPLI) आणि डाक जीवन विमा (PLI) योजना राबविण्यात येतात. या योजनांच्या प्रचार व प्रसारासाठी तसेच विमा पॉलिसी विक्रीसाठी विभागात अंतर्गत रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता फक्त १०वी उत्तीर्ण ठेवण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी असून, खाली भरतीबाबत सविस्तर माहिती दिली आहे. भारतीय डाक विभाग, डाक जीवन विमा तसेब ग्रामीण डाक जीवन विमा द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली उपलब्ध आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Dak Vibhag Bharti 2025 : Rural Postal Life Insurance (RPLI) and Postal Life Insurance (PLI) schemes are implemented under the Indian Postal Department. Recruitment process is being conducted for the vacant posts within the department for the promotion and dissemination of these schemes as well as for the sale of insurance policies.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : भारतीय डाक विभाग, डाक जीवन विमा तसेब ग्रामीण डाक जीवन विमा द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
पदाचे नाव : अभिकर्ता.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन :
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिक माहिती येथे क्लीक करा

अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
निवड प्रक्रिया : मुलाखत.
वयोमर्यादा : १८ ते ५० वर्षे.
भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
पदाचे नाव : अभिकर्ता (विमा एजंट).
इतर आवश्यक पात्रता :
1) अर्जदाराने केंद्र/राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त मंडळ/संस्थेद्वारे घेतलेली दहावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
2) अनुभवः अर्जदाराला विमा योजनांचे ज्ञान, मार्केटिंग कौशल्ये आणि संगणकाचे कामकाजाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण : ठाणे. (Jobs in Thane)
◾बेरोजगार / स्वयंरोजगार असलेले तरुण, महिला, माजी जीवन विमा सल्लागार, कोणत्याही विमा कंपनीचे माजी एजंट, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, महिला मंडळाचे कार्यकर्ते, निवृत्त शालेय शिक्षक, बचत गट, ग्रामपंचायतीचे सदस्य पीएलआय डायरेक्ट एजेटसाठी अर्ज करू शकतात.
◾ज्या उमेदवारांची पोएलआय/आरपीएलआय ‘डायरेक्ट एजेट’ म्हणून निवड केली जाईल त्यांना वेळोवेळी पदांच्या विभागांनी ठरवून दिलेल्या दरांनुसार प्रोत्साहन/कमिशन आधारावर नियुक्त केले जाईल.
◾पीएलआय/आरपीएलआय डायरेक्ट एजंटसाठी उमेदवारांची निवड थेट मुलाखतीच्या आधारे केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाईल.
◾निवड केलेल्या उमेदवारांना ‘परवाना परीक्षा द्यावी लागेल आणि ‘परवाना परीक्षा’ यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्यानंतर आणि प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच परवाना जारी केला जाईल.
◾निवडलेल्या उमेदवारांना तात्पुरत्या परवान्यासाठी ५०/- रुपये आणि कायमस्वरूपी परवाना परीक्षा शुल्कासाठी ४००/- रुपये शुल्क भरावे लागेल.
◾उत्तीर्ण उमेदवारास रु. ५०००/- (रुपये पाच हजार मात्र) चे राष्ट्रीय बचत पत्र (NSC) “सिक्युरिटी डीपॉझीट” स्वरूपात भरणे बंधनकारक राहील.
◾मुलाखतीसाठी उमेदवारांनी मूळ शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे, पैन कार्ड, आधार कार्ड, फोटो आणि इतर संबंधित कागदपत्रांसह खालील कार्यालयात उपस्थित राहावे.
मुलाखतीची तारीख : १० जुलै २०२५ सकाळी ११.०० वाजेपासून.
मुलाखतीचा पत्ता : वरिष्ठ अधीक्षक डाकघर ठाणे मंडल यांचे कार्यालय, दुसरा मजला, ठाणे (प) रेल्वे स्टेशन जवळ, ठाणे-४००६०१.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!