दारूबंदी पोलीस भरती 2024 : निकाल जाहीर! येथे पहा पुर्ण निकाल. | Darubandi Police Bharti 2024 Results

Darubandi Police Bharti 2024 Results : महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारितील राज्य उत्पादन शुल्क विभाग (दारूबंदी पोलीस विभाग) मधील विविध कार्यालयातील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान (दारूबंदी पोलीस) तसेच जवान-नि-वाहनचालक गट-क प्रवर्गातील आणि चपराशी (गट-ड) संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे नामनिर्देशनाद्वारे भरण्याकरिता राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पध्दतीने टी.सी.एस. यांच्याद्वारे घेण्यात आलेली आहे. सदर परीक्षा दिनांक ०८ जानेवारी, २०२४ ते १४ जानेवारी, २०२४ या कालावधीत घेण्यात आली आहे. त्याचा निकाल लागला आहे. निकाल खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Darubandi Police Bharti 2024 Results : चपराशी व जवान या पदांची परीक्षा अनुक्रमे एक व चार दिवसात विविध सत्रात घेण्यात आलेल्या आहेत. सदरची परीक्षा ऑनलाईन असल्यामुळे प्रत्येक सत्रात वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामुळे काठीण्य पातळीमध्ये समानता राहावी म्हणून गुणांचे समानीकरण (Normalization) करणे आवश्यक असते. या दोन्ही पदांसाठी ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली आहे, त्यांना नियमित व समानीकरण (Normalization)- Mean Standard Deviation Method या पध्दतीने मिळालेले गुण या विभागाच्या वेबसाईट वर प्रसिध्द करण्यात आलेले होते. मीन स्टॅन्र्डड डेव्हीएश मेथड (Mean Standard Deviation Method) बाबतची सविस्तर माहिती फॉर्म्युला या विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सर्व पदांचा निकाल खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
राज्य उत्पादन शुल्क विभाग
(दारूबंदी पोलीस भरती 2024)
सर्व पदांचा निकाल
पाहण्यासाठी
येथे क्लीक करा

जवान व जवान-नि-वाहनचालक या पदासाठी लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांच्या पुढील मैदानी चाचणी जून, २०२४ अखेर अथवा जुलै, २०२४ मध्ये घेण्यात येईल. लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान तसेच जवान-नि-वाहनचालक गट क प्रवर्गातील आणि चपराशी (गट-ड) संवर्गातील लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांची यादी वरती दिली आहे.


error: Content is protected !!