Data Entry Operator Bharti 2024 : 12वी पास असाल आणि नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेकरिता शिक्षण विभाग (प्राथमिक) विवीध जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त असणारी डाटा एंन्ट्री ऑरपरेटरची पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 12वी उत्तीर्ण उमेदवारांना जिल्हा परिषद विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली तसेच उत्तम संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. जिल्हा परिषद मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात जिल्हा निवड प्रक्रिया समिती तथा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Data Entry Operator Bharti 2024 : Vacant posts of Data Entry Operator under Zilla Parishad will be filled. For that, applications are invited from healthy, willing and eligible candidates fulfilling the following eligibility criteria.
◾भरती विभाग : जिल्हा परिषद व प्राथमिक शिक्षक विभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : जिल्हा परिषद अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : ‘डाटा एंट्री ऑपरेटर’ ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील.
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 20,650 रूपये मासिक पगार दिला जाणार आहे.
◾जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे.
◾भरती कालावधी : 11महिन्यांच्या कालावधीकरीता कंत्राटी पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾व्यावसायिक पात्रता :
1] 12 वी पास असणे आवश्यक आहे. (पदवीधर उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल)
2] मराठी टंकलेखन 30 शब्द प्र. मि.
3] इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्र.मि.
4] MS-/CIT किंवा समकक्ष परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾एकूण पदे : 04 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : सातारा. (Jobs in Satara)
◾शैक्षणिक व व्यावसायिक अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या उमेदवारास इ. 10 वा. इ. 12 वी मध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी यांची एकत्रित बेरीज करुन त्यामध्ये उमेदवार पदवीधर असल्यास त्यास 10 गुण बोनस देण्यात येतील. गुणांकन करुन उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल, गुणवत्ता मादीतील उमेदवारांना संगणक परिक्षेकरीता, एका पदासाठी गुणानुक्रमे 12 उमेदवार याप्रमाणे बोलावण्यात येतील.
◾सदर यादीमधील उमेदवारांची मराठी टायपिंग 130 शब्द प्रतिमिनिट व इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट आणि संगणक ज्ञानाची प्रात्याक्षिक परीक्षा घेण्यात येईल. यासाठी सर्व मिळून 100 गुण देण्यात येतोल व अशी एकूण 100 गुणांची परीक्षा एकाच दिवशी घेण्यात येईल, प्रस्तुत प्रात्यक्षिक परिक्षेमध्ये किमान 50 गुण प्राप्त होणारे उमेदवार निवडीसाठी पात्र राहतील.
◾मधील गुण एकत्रित करून गुणानुक्रमे मंजूर पदासाठी निवड यादी प्रसिध्द केली जाईल आणि त्यानुसार सदर उमेदवारांना कंत्राटी पध्दतीने तात्पुरत्या स्वरूपात डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून नियुक्ती देण्यात येईल व तेवढयाच, पुढील उमेदवारांची प्रतिक्षा यादी प्रसिध्द केली जाईल.
◾सदर पदांची भरती कंत्राटी पध्दतीने करावयाची असल्याने बिंदू नामावली प्रमाणे पदे भरण्याची आवश्यकता नाही.
◾अंतीम निवड यादी प्रसिध्द करणेपूर्वी रिक्त पदांची संख्या वाढल्यास याच यादीमधून रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 19 ऑगस्ट 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : सातारा जिल्हा परिषद सातारा.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.