‘डेटा एंट्री ऑपरेटर’ पदांची सामान्य रुग्णालय मध्ये भरती! | मासिक वेतन – 18,000 रूपये | Data Entry Operator Bharti 2025

Data Entry Operator Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य रुग्णालय, अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत “डेटा एंट्री ऑपरेटर” पदासाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 18,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Data Entry Operator Bharti 2025 : Applications are invited from eligible candidates for the recruitment process under Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana under the General Hospital of the Government of Maharashtra. Candidates will be selected for the post of "Data Entry Operator" under this recruitment. The selected candidates will be given a monthly salary of Rs. 18,000. The educational qualifications, experience and terms and conditions required for the relevant post are as follows.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : सामान्य रुग्णालय मध्ये भरती.
पदाचे नाव : डेटा एंट्री ऑपरेटर. (Data entry operator)
मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 18,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
📑 अधिकृत
जाहिरात
येथे क्लीक करा
🧾 अधिक
माहिती
येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज स्वीकारले जात आहेत.
शैक्षणिक व इतर पात्रता :
1. कोणत्याही शाखेतील पदवीधर
2. टंकलेखन – मराठी 30 श.प्र.मि. आणि इंग्रजी 40 श.प्र.मि.
3. एम.एस.सी.आय.टी. प्रमाणपत्र
4. किमान 1 वर्षाचा अनुभव आवश्यक.
नोकरीचे ठिकाण : जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये (मुक्ताईनगर, चोपडा, जामनेर, जळगाव, चाळीसगाव)
अटी व शर्ती :
1. ही भरती पूर्णतः मानधन तत्वावर आणि कंत्राटी स्वरूपात केली जाणार आहे.
2. निवड प्रक्रिया ही निवड समितीच्या निर्णयानुसार केली जाईल. अर्ज स्वीकृती किंवा नकाराचा अधिकार समितीकडे असेल.
3. उमेदवारांनी अर्जासोबत शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्रांची छायांकित प्रत, पासपोर्ट साईझ फोटो, हस्ताक्षरित अर्ज आणि संपूर्ण पत्त्यासह संपर्क क्रमांक जोडणे आवश्यक आहे.
4. अर्ज सादर करण्याचे ठिकाण – जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय, जळगाव यांच्या कार्यालयात, कार्यालयीन वेळेत.
5. अर्जाची अंतिम मुदत – 21 / 04 / 2025 ते 28 / 04 / 2025 दरम्यान अर्ज स्वीकारले जातील.
6. कोणत्याही अन्य कार्यालयामार्फत किंवा इतर विभागांना सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
◾उमेदवारांनी अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करावी. अपूर्ण अर्ज, अपुरे कागदपत्र किंवा मुदतबाह्य अर्ज नाकारण्यात येतील.
◾भरतीसंबंधी अंतिम निर्णय जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय, जळगाव यांचा असेल.
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

error: Content is protected !!