पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
सरकारी विभागांत नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. जिल्हा परिषद सातारा व्दारे डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदांच्या एकूण 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. नियम व अटी : विहीत नमुन्यात उमेदवारांनी विहीत नमुन्यात अलीकडच्या काळातील साक्षांकित पासपोर्ट साईज फोटोसह अर्ज सादर करावा, सदर अर्जाच्या पाकिटांवर डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाकरीता अर्ज असे नमुद करावे.
अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता, वय, अनुभव इत्यादी संदर्भातील कागदपत्रांच्या छायांकित साक्षांकित प्रती जोडाव्यात. अर्ज दिलेल्या दिनांक पर्यंत सकाळी 10.30 ते सायं. 06.00 या वेळेत, समक्ष अथवा पोष्टाने, सुट्टीचे दिवस वगळून स्विकारले जातील, त्यानंतर आलेले अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्विकारले जाणार नाहीत. पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द झालेनंतर त्या उमेदवारांनी www.zpsatara.gov.in या संकेतस्थळावरून परीक्षेचे प्रवेश पत्र डाउनलोड करून त्यावर उमेदवाराचा अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवून व साक्षांकित करून प्रवेश पत्रावर नमूद असलेल्या परिक्षेच्या ठिकाणी नमूद वेळेच्या अगोदर उपस्थित रहावे. सविस्तर सूचना प्रवेश पत्रावर देण्यात येतील.
परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्तीपूर्वी उमेदवारांकडून शासनाकडील विहीत नमुन्यात करारनामा करुन घेण्यात येईल आणि त्यासोबत उमेदवारावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा व आरोप नसल्याचे प्रतिज्ञापत्र स्वतंत्रपणे सादर करावे लागेल. कंत्राटी पध्दतीने नियुक्त केलेल्या डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदासंबंधी सेवा शर्ती, शैक्षणिक अर्हता, एकत्रित ठोक मानधन व नियुक्तों कार्यपध्दती यासंबंधी आवश्यक ते बदल तसेच निर्णय घेण्याचे आधिकार शासनास राहतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 आहे.