अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
नोकरी शोधताय? जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये एकूण 02 पदे भरली जात आहेत. या भरतीसाठी वय हे खुला प्रवर्ग: 38 वर्षे, राखीव वर्ग: 43 वर्षे असणे आवश्यक आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन / मानधन दरमहा रु. २५००० दिले जाणार आहे.
निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना कोल्हापूर हे नोकरी ठिकाण असणार आहे. 16 डिसेंबर 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची दिनांक आहे. शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि.प. कोल्हापूर या ठिकाणी अर्ज स्वीकारला जाईल. तर या भरतीसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा १०/०१/२०२५ रोजी घेतली जाणार आहे. अर्जाची छाननी, परिक्षा / निवड यादी प्रसिध्द करणे, हरकती/आक्षेप प्राप्त करुन घेणे व त्या निकाली काढणे आदी रितसर शासनाच्या तसेच शालेय पोषण आहाराकडील प्राप्त मार्गदर्शक सुचनांनुसार भरती प्रक्रिया पार पाडून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देणेत येईल. याबाबत सविस्तर तपशिल वेळोवेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर www.zpkolhapur.gov, in प्रसिध्द करणेत येईल. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. याबाबत पुनःश्च वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिली जाणार नाही. याकरिता प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर या कार्यालयास कार्यालयीन वेळेत संपर्क साधु शकता. ५) अर्जासोबत परिक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज ग्राहय धरला जाणार नाही.
नियुक्तीपूर्वी उमेदवाराकडून शासनाकडील विहीत नमुन्यात रु. १००/- चे स्टॅम्पपेपरवर करारनामा करुन घेण्यात येईल आणि त्याचप्रमाणे कर्मचा-यांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा किंवा आरोप नसल्याचे प्रतिज्ञापत्र स्वतंत्रपणे सादर करावे लागेल. कंत्राटी पध्दतीने नियुक्त केलेल्या डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदासंबंधी सेवा व शर्ती, शैक्षणिक अर्हता, एकत्रित ठोक मानधन व नियुक्तीची कार्यपध्दती या संदर्भात आवश्यक ते बदल तसेच निर्णय घेण्याचे अधिकार शासनास राहतील. डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून नियुक्ती केलेल्या कंत्राटी पध्दतीच्या कर्मचा-यांस नियमित नियुक्तीसाटी कोणतेही हक्क असणार नाहीत. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.