PDF पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
नमूना अर्ज | येथे क्लीक करा |
डाटा एंट्री ऑपरेटर पदांची जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम येथे रिक्त पद भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये एकूण 01 पदे भरली जाणार आहेत. वाशीम जिल्ह्यात नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही कुठल्याही शाखेतील पदवी आणि MS-CIT ही आहे. 18 ते 35 वर्ष वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना वेतन/ मानधन हे दरमहा रु. 16,000/- रूपये दिले जाणार आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन (Offline) आहे. या कंत्राटी भरतीकरीता इच्छुक पात्र उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून दिनांक – 23/08/2024 (कार्यालयीन दिवशी) या कालावधीत सकाळी 11.00 ते सायं 4.00 वा. या दरम्यान अर्जदाराने यासोबत दिलेल्या अर्जाच्या नमुन्यामध्ये माहीती भरुन आवश्यक कागदपञचे सांक्षांकीत प्रतीसह जिल्हा सेतू समिती जि.का. वाशिम या विभागात अर्ज सादर करणे आवश्यक आहे.