DBSKKV Bharti 2025 : महाराष्ट्र शासनची सरकारी नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. राज्यातील कृषि विद्यापीठातील गट-क व गट-ड संवर्गातील 0249 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 7वी / 10वी / 12वी / पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. या भरतीची जाहिरात कृषि विद्यापीठ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
DBSKKV Bharti 2025 : If you are looking for a government job in Maharashtra Government, this is a great opportunity. Advertisement has been published to fill 0249 vacant posts in Group-C and Group-D cadres in the agricultural university of the state.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : कृषि विद्यापीठ द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदे : शिपाई, कृषी सहाय्यक, वायरमन, प्रयोगशाळा सहाय्यक, लिपिक, मदतनीस, पहारेकरी व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : 7वी / 10वी / 12वी / पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन : 25,500 ते 81,100 रुपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे. (प्रत्येक पदांचे मासिक वेतन वेगवेगळे आहे. PDF जाहिरात वाचा.)
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व पुर्ण माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 43 वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
◾पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
▪️कनिष्ठ संशोधन सहाय्यक : कृषी / उद्यानविद्या विद्याशाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.
▪️कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील अभियांत्रिकी (स्थापत्य) शाखेमधील पदविका किंवा पदवी उत्तीर्ण.
▪️वरिष्ठ लिपीक :
1] कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण.
2] मराठी टंकलेखनाचे किमान ३० श. प्र.मि. वेगमयदिचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० श.प्र.मि. बेगमर्यादा शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र उत्तीर्ण.
▪️लिपीक :
1] कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण.
2] मराठी टंकलेखनाचे ३० श.प्र.मि. वेगमयदिचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० श.प्र.मि. वेगमर्यादा शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र उत्तीर्ण.
▪️कृषि सहाय्यक : कृषि/उद्यानविद्या/वनशास्त्र / कृषितंत्रज्ञान/कृषि अभियांत्रिकी /गृहविज्ञान/मत्स्यविज्ञान / जैवतंत्रज्ञान /अन्नतंत्रज्ञान/कृषी व्यवसायव्यवस्थापन या विषयातील पदवी उत्तीर्ण किंवा मान्य संस्था/कृषि शासन विद्यापीठाकडील कृषि पदविका/कृषि तंत्र पदविका परीक्षा उत्तीर्ण.
▪️वीजतंत्री :
1] एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण.
2] औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील वीजतंत्री प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
3] एक वर्षाचे (एन.सी.व्ही.टी.) व्यवसायाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
▪️वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (मत्स्य) : मत्स्य विद्या शाखेतील पदवी किंवा पदविका उत्तीर्ण.
▪️प्रयोगशाळा सहाय्यक (मत्स्य) : मत्स्य विद्या शाखेतील पदविका उत्तीर्ण.
▪️प्रयोगशाळा सहाय्यक : कृषिअभियांत्रिकी शाखेतील पदवी उत्तीर्ण.
▪️प्रयोगशाळा सहाय्यक (पी.एच.एम.) : कृषि/कृषि अभियांत्रिकी/मत्स्य विद्याशाखा या शाखांमधील पदविका/पदवी उत्तीर्ण.
▪️यंत्रचालक (बोट) : व्यापारी सागरी जहाज खात्याचे जहाज ६ चालविण्याचे द्वितीय श्रेणीतील प्रमाणपत्रासह शासनमान्य नोंदणीकृत सस्थेतील सागरी तेल यंत्राचे संधारण व दुरूस्तीचा एक वर्षाचा अनुभव आवश्यक.
▪️तांडेल : मत्स्य पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय खात्याचा किमान तीन किंवा सहा महिने कालावधीचा प्रशिक्षण अभ्यासकम उत्तीर्ण, आणि शासनमान्य नोंदणीकृत संस्थेतील मासेमारी, नौकानयन आणि खलाशी कामाचा किमान २ वर्षाचा अनुभव.
▪️कर्षित्रचालक :
1] एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण.
2] औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील मेकॅनिक ट्रॅक्टर प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
3] विभागीय परिवहन अधिकारी यांचेकडील ट्रॅक्टर व जडवाहन चालविण्याचा परवाना आवश्यक.
4] एक वर्षाचे (एन.सी.व्ही.टी.) व्यवसायाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
▪️वाहनचालक :
1] एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण.
2] हलके वाहन आणि जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक.
3] बस चालविण्याकरिता बॅच नंबर आवश्यक
▪️कुशल मासेमार : महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाचा तीन किंवा सहा महिने कालावधीचा प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण, आणि शासनमान्य नोंदणीकृत संस्थेतील मासेमारी, नौकानयन आणि खलाशी कामाचा दोन वर्षांचा अनुभव.
▪️मासेमार : महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय खात्याचा तीन किंवा सहा महिने कालावधीचा प्रशिक्षण अभ्यासकम उत्तीर्ण, आणि शासनमान्य नोंदणीकृत संस्थेतील मासेमारी, नौकानयन आणि खलाशी कामाचा दोन वर्षाचा अनुभव.
▪️बोटमन/डेकहॅण्ड : महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाचा तीन किंवा सहा महिने कालावधीचा प्रशिक्षण अभ्यासकम उत्तीर्ण, आणि शासनमान्य नोंदणीकृत संस्थेतील खलाशी कामाचा एक वर्षाचा अनुभव.
▪️शिपाई : माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
▪️माळी : कृषि विद्यापीठ मान्यताप्राप्त १ वर्षाचा माळी.
प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण.
▪️पहारेकरी : किमान ७ वी उत्तीर्ण तसेच सुदृढ प्रकृती ६ असणारा.
▪️स्वच्छक : किमान ४ थी उत्तीर्ण.
▪️मदतनीस : किमान ४ थी उत्तीर्ण.
▪️मजूर : किमान ४ थी उत्तीर्ण.
◾महत्वाचे : सदर जाहिरात फक्त डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोलीच्या कार्यक्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांसाठी (विद्यापीठ प्रकल्पग्रस्त) प्रसिध्द करण्यात येत असल्यामुळे इतर कोणत्याही उमेदवारांनी अर्ज सादर करू नयेत. असे अर्ज प्राप्त झाल्यास ते विचारात न घेता अपात्र ठरविण्यात येतील.
◾एकूण पदे : 0249 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : कुलसचिव, डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली, ता.दापोली, जि. रत्नागिरी येथे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.