
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
दि गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक लिमिटेड, गोंदिया या बँकेकरीता द्वितीय श्रेणीतील ०५ रिक्त, तृतीय श्रेणीतील रिक्त ४७ व चतुर्थ श्रेणीतील रिक्त २५ पदे ऑनलाईन परीक्षा प्रक्रियेद्वारे सरळसेवा भरती करण्याकरीता महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या पात्र उमेदवारांकडून निवड सुची तयार करणेसाठी विहीत नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. बैंकेचे संकेतस्थळ gondiadccb.co.in किंवा gondiadccb.in या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहेत.
या भरती मध्ये शिपाई, लिपिक व इतर पदे भरली जात आहेत. तुम्ही पात्र असाल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करा. या भरतीसाठी 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. 31 जानेवारी 2025 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. नियम व अटी : उमेदवारांनी या नोकरभरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी बँकेच्या gondiadech.co.in किंवा gondiadeeb.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे बंधनकारक राहील. परीक्षा शुल्क रक्कम रु. ७५० १८ टक्के जी.एस.टी. रु. १३५/- अशी एकूण रक्कम रु. ८८५/-ऑनलाईन पद्धतीने भरावयाची आहे. या व्यतिरिक्त उमेदवारांचे लेखी अर्ज व परीक्षा शुल्क बँकेच्या कोणत्याही कार्यालयात प्रत्यक्ष स्विकारले जाणार नाहीत व हे अर्ज ग्राहय धरले जाणार नाहीत.
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना स्वतःचा ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक व आधारकार्ड क्रमांक अचूक नमूद करणे आवश्यक आहे. उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरतांना ज्या पदासाठी तो अर्ज करीत आहे त्या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता धारण करीता असल्याची खात्री करुनच अर्ज भरावा. पात्र व अपात्र अर्जाबाबतची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध राहील. सदर भरती प्रक्रिये दरम्यान बँकेच्या संकेत स्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेच्या अद्यावत माहितीचे अवलोकन करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरतेवेळी संकेतस्थळावर तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास 7387371877 हा हेल्पलाईन क्रमांक आहे. अर्ज भरण्यास अडचण निर्माण झाल्यास support@gondiadeeb.co.in या मेल आयडीवर ईमेलद्वारे संपर्क साधावा. वरील हेल्पलाईन क्रमांक व मेल आयडी फक्त काही तांत्रिक अडचणी (अर्ज भरतेवेळी, मुलाखत पत्र डाऊनलोड करतेवेळी इ.) निर्माण झाल्यास संपर्काकरीता आहे. द्वितीय श्रेणी, लिपीक व शिपाई पदांच्या सरळसेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज विहीत नमुन्यात सादर करण्यासाठीची पात्रता, निकष व इतर तपशिल खालीलप्रमाणे राहील.