District Central Cooperative Bank Bharti 2024 : जर बँकिंग क्षेत्रात नोकरी पाहिजे असेल आणि शैक्षणिक पात्रता 10वी, 12वी, आणि पदवीधर असेल तर नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये लिपीक 0261 व शिपाई 097 पदे ऑनलाईन प्रक्रियेव्दारे सरळसेवा भरती करण्याकरीता पात्र उमेदवारांकडुन ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात व अर्ज लिंक खाली पहा.
District Central Cooperative Bank Bharti 2024 : If you want a job in banking sector and educational qualification is 10th, 12th, and graduate then there is a good chance to get job. District Central Co-operative Bank is inviting online applications from eligible candidates for direct service recruitment for Clerk 0261 and Sepoy 097 posts through online process.
◾बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदे : शिपाई व लिपिक.
◾शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण आहे.
◾0358 नवीन जागा भरण्यात येत आहेत.
◾जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी पाहिजे.
◾ऑनलाईन अर्ज लिंक व pdf जाहिरात खाली पहा.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू : दिनांक 08 ऑक्टोंबर 2024 पासून या भरतीला सुरुवात झाली होती.
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online).
◾भरती कालावधी : कायमस्वरुपी (Permanent) नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾वय : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 45 वर्षे दरम्यान आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
◾पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️लिपीक :
1] अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर (मान्यता प्राप्त विद्यापीठ) आणि एमएससीआयटी किंवा तत्सम परिक्षा उत्तीर्ण असणे.
2] वाणिज्य शाखेचा पदवीधर / पदव्युत्तर पदवी व बँकींग क्षेत्रातील लिपीक / वरिष्ठ श्रेणीतील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव असल्यास प्राधान्य. त्याचप्रमाणे इंग्रजी मराठी टंकलेखन, लघुलेखनाची परिक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.
▪️शिपाई (Peon) :
किमान इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा, कागदपत्रे पडताळणी व प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखचनि उपस्थित राहावे लागेल.
◾ऑनलाईन परीक्षेनंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीपुर्वी कागदपत्रे पडताळणीसाठी बोलविले जाईल. त्यावेळी उमेदवारांना सर्व मुळ कागदपत्रे घेवुन हजर राहणे बंधनकारक राहील. आणि यासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही. कागदपत्रे पडताळणीसाठी गैरहजर असलेल्या उमेदवारांना निवड प्रक्रियेतुन बाद समजण्यात येईल.
◾उमेदवाराची ऑनलाईन परीक्षा प्रामुख्याने चंद्रपुर शहरातील व जिल्हयातील केंद्रावर घेण्यात येईल. मात्र परिक्षार्थीची संख्या विचारात घेवुन आवश्यक्तेनुसार इतर शहरातील केंद्रावरही परीक्षा घेतली जाईल.
◾भरती प्रक्रियेत निवड कार्यपध्दतीत बदल करण्याचा अधिकार बँकेस असेल व ऐनवेळी काही बदल झाल्यास तो वर्तमानपत्रात किंवा बँकेच्या संकेत स्थळावर प्रसिध्द केला जाईल, याबाबत अर्ज केलेल्या उमेदवारांना वैयक्तीक स्वरुपात कळविले जाणार नाही.
◾उमेदवारास मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
◾उमेदवारांनी त्यांचा अर्ज बँकेच्या संकेत स्थळावरुन स्वतःव्या माहितीसाठी डाऊनलोड करुन घेण्याची जबाबदारी सर्वस्वी उमेदवाराची राहील.
◾उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरतांना स्वतःची पुर्ण माहिती ही अचुक भरावी.
◾उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने अर्ज करतांना शैक्षणीक कागदपत्रे अन्य प्रमाणपत्र व पुरावे जोडणे आवश्यक नाही.
◾ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरतेवेळी उमेदवारांना कागदपत्रे सादर करावयाची नसली तरी ज्या उमेदवारांकडे आवश्यक शैक्षणीक अर्हता असेल त्यांनीच उमेदवारी अर्ज दाखल करावा.
◾शेवटची दिनांक : १९ ऑक्टोबर २०२४.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.