District Court Bharti 2024 : उच्च न्यायालय, मुंबई यांचे संदर्भिय पत्र आणि परिपत्रक अन्वये नाशिक जिल्हा न्यायीक आस्थापनेवर रिक्त पद भरवायची आहेत. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्हा न्यायालय मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
District Court Bharti 2024 : As per the reference letter and circular of the High Court, Mumbai, vacant posts are to be filled in Nashik District Judicial Establishment. Applications are invited from interested and eligible candidates for the same.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जिल्हा न्यायालय द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾ मासिक मानधन / वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 19,900 ते 63,200 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾निवड प्रक्रिया : परीक्षा व मुलाखत.
◾इतर आवश्यक पात्रता :
1] उमेदवार जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक यांचे अधिपत्याखालील सर्व न्यायालयांचे आस्थापनेवर कार्यरत असलेल्या व तीन वर्षाची सलग सेवा पुर्ण केलेल्या मुख्य बेलीफ, बेलीफ, वाहन चालक, पुस्तक बांधणीकार, झेरॉक्स ऑपरेटर, हवालदार, नाईक, शिपाई-पहारेकरी व सफाईगार यापैकी एक असावा.
2] कर्मचारी कमीत कमी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर अमावा. तमेच कोणत्याही मान्याताप्राप्त विद्यापीठाचा पदव्युत्तर पदवी आणि कायद्याच्या (विधी) पदवीधगम प्राधान्य दिलं जाईल.
3] सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा किंवा सरकारी मंडळाद्वारे घेतलेली परीक्षा किंवा संगणक टंकलेखन बेसिक कोर्स यामध्ये सरकारी प्रमाणपत्र (GCC-TBC किंवा I.T.I.) यामध्ये इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा त्याहून अधिक गती आणि मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. किंवा त्याहून अधिक गती.
◾नोकरी ठिकाण : नाशिक (Jobs in Nashik)
◾सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा किंवा सरकारी मंडळाद्वारे घेतलेली परीक्षा किंवा संगणक टंकलेखन बेमिक कोर्स यामध्ये सरकारी प्रमाणपत्र (GCC-TBC किंवा I.T.I.) यामध्ये इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा त्याहून अधिक गती आणि मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. किंवा त्याहून अधिक गती.
◾खालीलपैकी कोणत्याही संस्थेतुन प्राप्त M.S.Office, M.S.Word, Wordstar-7 आणि Open Office Org. या व्यतिरिक्त Windows आणि Linux मध्ये Word Processor चालवण्यामध्ये प्राविण्याबद्दल संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
◾कनिष्ठ लिपीक पदासाठीच्या उमेदवारांची संगणकावर ३० गुणांची मराठी टंकलेखन परीक्षा व ३० गुणांची इंग्रजी टंकलेखन परीक्षा व ३० गुणांची मौखिक मुलाखत घेण्यात येईल.
◾कर्मचारी कार्यरत असलेल्या पिठासीन अधिकारी यांचे विशेष अहवालाकरिता १० गुण असतील.
◾कर्मचा-यांना परीक्षा आणि मौखिक मुलाखतीस बोलविल्यास स्वः खर्चाने हजर रहावे लागेल.
◾प्रतिक्षा / निवड सुची प्रसिध्द झाल्यापासून ती फक्त २ वर्षाच्या कालावधीपर्यंत वैध राहील.
◾उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल अशा उमेदवारांनी त्यांचे मुळ कागदपत्रे पडताळणीसाठी सोबत आणणे आवश्यक राहील. अर्जदाराने कोणतीही खोटी माहिती दिल्यास त्याचा अर्ज नाकारण्यात येईल.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 18 डिसेंबर 2024.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.