पुर्ण PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
नमूना अर्ज | येथे क्लीक करा |
सरकारी नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर येथे पुस्तक बांधणीकार ही पदे भरली जात आहेत. त्यासाठी 10वी व सबंधित ट्रेड मध्ये उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांची भरती केली जात आहे. या भरती मध्ये एकूण 02 पदे भरली जात आहेत. जे उमेदवार लातूर (Jobs in Latur) मध्ये काम शोधत असतील त्यांना ही लातूर मध्ये नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे.
ज्या उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षांची सूट) दरम्यान आहे ते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरणार आहेत. तुम्ही ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. या कार्यालयाने सदर भरतीसाठी कोणतेही शुल्क आकारलेले नाही, ही भरती पुर्णपणे विनाशुल्क आहे, उमेदवारांनी अर्ज दाखल करते वेळी कोणत्याही प्रकारच्या शुल्कापोटी कोणतेही दर्शनी धनाकर्ष (Demand Draft), प्रदानादेश (Pay Order), धनादेश (Cheque) इत्यादी अर्जासोबत पाठवू नये, याची नोंद घ्यावी.
अर्ज करण्याची पध्दत जाहिरात, अर्ज व प्रमाणपत्र जिल्हा न्यायालय, लातूरचे संकेतस्थळ https://latur.dcourts.gov.in यावर उपलब्ध आहेत. त्या नमुन्यातच अर्ज व सोबतची प्रमाणपत्रे आणि कागदपत्रांच्या स्वः प्रमाणित प्रती अर्जासोबत सादर करावीत. 25 सप्टेंबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. तर अर्ज पाठवण्याचा पत्ता प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर हा आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.