पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
राष्ट्रीय आरोग्य अभियान व जिल्हा एकात्मिक आरोग्य विभाग नंदुरबार अंतर्गत कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ ही एकूण 024 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी १२वी उत्तीर्ण + डिप्लोमा, एमपीएच/एमएचए/एमबीए सह कोणतेही वैद्यकीय, एम. एससी. प्राणीशास्त्र मध्ये उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
निवड झालेल्या उमेदवारांना वेतन / मानधन रु. 17,000/- ते 40,000/- ते दिले जाणार आहे. किमान 18 वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील. या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. निवड झालेल्या अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्यांचे सोईनुसार ठिकाण बदलुन मिळण्याची मागणी करता येणार नाही. अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांच्या सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी अचूक नोंदवाव तसेच ते भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी.
अर्जाचा नमुना जाहिराती सोबत प्रसिध्द करण्यात आलेला असुन सदरील नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास उमेदवारांचा अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही. उमेदवारांचा अर्ज अपुर्ण व अर्धवट भरलेला असल्याने नाकारला गेल्यास सर्वस्वी जबाबदारी ही उमेदवारांची राहील. भरती प्रक्रियेच संपूर्ण अधिकार, पदे कमी जास्त करणे, भरती प्रक्रिया रद्द करणे, अटी व शर्तीमध्ये बदल करणे, पदस्थापनेच्या ठिकाणामध्ये बदल करणे, इत्यादी सर्व अधिकार हे या कार्यालयाचे असून निवड प्रक्रियेत कोणत्याही क्षणी बदल करण्याचे अधिकारी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार यांनी राखून ठेवलेले आहेत. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख ही 08 ऑगस्ट 2024 ही आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 ऑगस्ट 2024 ही आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता: आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार.