फायरमन भरती 2025 | शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण | Fireman Bharti 2025

Fireman Bharti 2025 : नगरपरिषद अंतर्गत फायरमन पदभरती 2025 वर्ग ड (४) साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. वर्ग ४ (ड) प्रवर्गातील “फायरमन” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. ही पदभरती जाहिरात अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली असून, या माध्यमातून रिक्त भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विहित नमुन्यात भरून दिलेल्या पत्त्यावर विहित मुदतीपूर्वी सादर करणे आवश्यक आहे. अधिकृत pdf जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Fireman Bharti 2025 : Advertisement has been published for Fireman Recruitment 2025 under Municipal Council Class D (4). Applications are invited from eligible candidates for the post of "Fireman" in Class 4 (D) category in the prescribed format. This recruitment advertisement has been officially published and the vacancies will be filled through this medium.

भरती विभाग : नगरपरिषद अंतर्गत अग्निशमन विभाग मध्ये ही भरती होत आहे.
भरती प्रकार : महाराष्ट्र शासनची नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
पदाचा वर्ग: ड (Group D)
पदाचे नाव: फायरमन (Fireman)
वेतनश्रेणी: ₹18,000/- ते ₹56,900/- पर्यंत.
शैक्षणिक व इतर आवश्यक पात्रता : उमेदवार किमान शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
📑 Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
🌐 अर्ज येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहेत.
वयोमर्यादा : जाहिरात प्रसिद्ध दिनांकाच्या अनुषंगाने उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे व कमाल ३३ वर्षे असावे.
इतर पात्रता :
▪️उमेदवाराने शासनाच्या राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांचा पाठ्यक्रम उत्तीर्ण, किंवा
महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ, किंवा
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडून मान्यताप्राप्त कोर्स उत्तीर्ण केलेला असावा.
▪️मराठी भाषेचे ज्ञान (लिहिणे, वाचणे व बोलणे) असणे आवश्यक आहे.
▪️MS-CIT किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️उमेदवाराकडे जड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे.

शारीरिक पात्रता (किमान निकष) :
▪️उंची: किमान १६५ से.मी.
▪️छाती: न फुगवता ८१ से.मी. आणि फुगवून ८६ से.मी.
▪️वजन: किमान ५० किलो.
▪️दृष्टी: चष्म्याशिवाय ५.५
अर्ज करण्याची प्रक्रिया :
▪️अर्ज पोस्टाव्दारे किंवा समक्ष नगरपरिषद कार्यालयात सादर करावा.
▪️अर्ज पाठविण्याचा शेवटचा दिनांक: ०२/०५/२०२५, सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत.
▪️अर्ज पाठविण्याचा पत्ता: मा. मुख्याधिकारी, कुरुंदवाड नगरपरिषद, कुरुंदवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर – ४१६१०६

महत्त्वाच्या सूचना :
▪️लेखी परीक्षा: रिक्त पदांच्या तुलनेत जास्त अर्ज प्राप्त झाल्यास, गुणवत्तेचे निकष लावण्यासाठी लेखी परीक्षा घेण्यात येईल.
▪️स्थानिक उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
अर्जासोबत पुढील प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक आहे:
१. एस.एस.सी. उत्तीर्ण प्रमाणपत्र
२. अग्निशामक कोर्स प्रमाणपत्र
३. MS-CIT किंवा तत्सम संगणक कोर्स प्रमाणपत्र
४. जड वाहन परवाना
५. दोन पेक्षा जास्त अपत्य नसलेले प्रतिज्ञापत्र
◾प्रशिक्षण व सेवाविषयक अट
नगरपरिषद सेवेत नियुक्तीनंतर, दर पाच वर्षांनी राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांनी विहीत केलेला रिफ्रेशर कोर्स पूर्ण करणे बंधनकारक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!