
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
वेबसाईट | – |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
आदिवासी विकास विभाग, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक यांच्या अधिनस्त असलेल्या पोलिस तथा सैन्य दल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, पेठ रोड, नाशिक येथे प्रशिक्षणा करिता आदिवासी मुलीची भरती प्रक्रीया राबविणे कामी जाहीरात प्रसिध्द करण्यात आली आहे. हे प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे.
या भरतीसाठी फक्त S.T (अनुसूचित जमाती) प्रवर्ग मधील मुली पात्र ठरणार आहेत. 1 एप्रिल 2025 पासून पोलीस तथा सैन्य दल भरतीपूर्व प्रशिक्षण चालू होणार आहे. हे प्रशिक्षण 4 महिने चालणार आहे. प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थ्यांना भोजन, निवास व गणवेश सुविधा पुरविण्यात येणार आहेत. या प्रशिक्षणसाठी 25 मार्च 2025 रोजी निवड केली जाणार आहे.
या प्रशिक्षण साठी पात्र होण्यासाठी मुलींची उंची – किमान १५० से. मी. असणे आवश्यक आहे. वजन किमान – ५० कि. ग्रॅ. वय – 18 ते 25 दरम्यान. शैक्षणिक पात्रता – 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ८००७९८०९१६ / ९४२०२६९०२३ या मोबाईल नंबर वर चौकशी करू शकता.