सामान्य प्रशासन विभाग मध्ये विविध नवीन रिक्त पदांसाठी भरती जाहिर! | GAD Mumbai Bharti 2024

GAD Mumbai Bharti 2024 : सामान्य प्रशासन विभागातील कामकाजाचा तसेच खाली दिलेल्या केलेल्या कामांसाठी आवश्यकतेनुसार नियुक्ती करण्यासाठी नामिकासूची (Panel) तयार करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची जाहिरात सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व अधिकृत जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
GAD Mumbai Bharti 2024 : The recruitment advertisement has been published by the General Administration Department, Mantralaya, Mumbai. Candidates should read the advertisement given below carefully before applying. The vacant posts in the advertisement, other necessary information about it, and the official advertisement are given below.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
अधिकृत pdf जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : ६५ वर्षापेक्षा अधिक नसावे.
भरती कालावधी : करार पध्दतीने नियुक्ती करण्याकरीता ही पदे भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव : सेवानिवृत्त कक्ष अधिकारी, सहायक कक्ष अधिकारी व लघुलेखक.
इतर आवश्यक पात्रता :
1] उमेदवार मंत्रालयीन प्रशासकीय विभागातील कक्ष अधिकारी, सहायक कक्ष अधिकारी व लघुलेखक या पदावरुन सेवानिवृत्त झालेला अधिकारी / कर्मचारी असावा.
2] उमेदवारास कक्ष अधिकारी, सहायक कक्ष अधिकारी व लघुलेखक या पदावरील किमान ३ ते ५ वर्षाचा अनुभव असावा.
एकूण पदे : 010 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : मुंबई. (Jobs in Mumbai)
◾उमेदवारास मराठी व इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असावे.
◾उमेदवारास तंत्रज्ञानाचे चांगले ज्ञान असावे.
◾उमेदवार मुंबई अथवा लगतच्या जिल्ह्यात राहणारा असावा.
◾आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या इच्छुक सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी सदर पदाकरिता विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
◾उमेदवाराने सदर पदाकरिता वेबसाईटवरील माहितीचे अवलोकन करुन desk९९- gad@mah.gov.in या मेल आयडीवर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून त्यांचे अर्ज १० दिवसांच्या आत सादर करावेत. या संदर्भात अधिक माहितीसाठी ०२२-२२८८१८९७ या दूरध्वनीवर संपर्क साधावा. विहित दिनांकानंतर प्राप्त झालेल्या अर्जावर कार्यवाही करण्यात येणार नाही. तसेच या संदर्भातील कोणत्याही पत्रव्यवहाराची दखल घेण्यात येणार नाही.
◾विभागास आवश्यक असलेलो अर्हता व अनुभव नसलेल्या सेवानिवृत्त अधिकारी यांनी अर्ज सादर केल्यास अशा अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. तसेच अशा अर्जासंदर्भात शासनाशी केलेल्या पत्रव्यवहाराची दखल घेण्यात येणार नाही. तसेच अशा अर्जाना उत्तर देण्यात येणार नाही.
◾मुलाखतीद्वारे पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल. उमेदवार निवडीबाबतचा संपूर्ण अधिकार विभागाचा राहील.
◾करार पध्दतीने नियुक्त सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांस सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई येथे काम करावे लागेल.
◾निवड करण्यात आलेल्या अधिका-यांची नामिकासूची तयार करून विवक्षित कामाची निकड विचारात घेऊन त्यांचेमधून आवश्यक कर्मचाऱ्यांची सेवा घेण्यात येईल.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 23 डिसेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : सामान्य प्रशासन विभाग, 5 वा मजला, मंत्रालय विस्तार इमारत, दालन क्रमांक- 557, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई-400 032.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


error: Content is protected !!