पुर्ण PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
जिल्हा परिषद पुणे अंतर्गत, ग्रामिण पाणी पुरवठा विभाग मध्ये सेवानिवृत्त (गट-अ) अभियांत्रिकी समन्वयक ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण / जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग मध्ये करण्यात येत आहे. एकूण 02 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुणे मध्ये काम शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. या भरती मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दरमहा ५४०० रूपये मानधन दिले जाणार आहे.
ज्या उमेदवारांची वयोमर्यादा ५८ ते ६५ वर्षे पर्यंत आहे ते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर पदासाठी अर्हता, अनुभव, आर्थीक मोबदला तसेच पदाची कर्तव्ये व जबाबदा-या इत्यादी बाबतचा तपशिल सोबतच्या परिशिष्ट “अ” मध्ये देण्यात आलेला आहे. सदर जाहिरात www.punezp.mkcl.org या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सदरच्या सेवांचे करार पध्दतीने अर्ज करताना सेवानिवृत्त अधिकारी हे शारीरीक व मानसिक सक्षम असल्याचे शासकीय रुग्णलयाचे वैद्यकिय प्रमाणपत्र देणे आवश्यक राहील.
करार पध्दतीने नियुक्ती केलेल्या अधिकारी यांना मासिक मानधन मासिक पारिश्रमिक म्हणून शासन निर्णय दिनांक- १७ डिसेंबर, २०१६ नुसार निश्चित करुनच देण्यात येईल. मासिक पारिश्रमिकाच्या जास्तीत २५% एवढया मर्यादपर्यन्त एक मुस्त रक्कम (निवास भत्ता, प्रवासभत्ता व दुरध्वनी भत्ता ) या सर्व भत्त्यापोटी अदा करणेत येईल. करार पध्दतीने नियुक्त केलेल्या सर्व नेमणूका करार संपल्यानंतर संपुष्टात येतील. करार पध्दतीने नियुक्त अधिकारी यांना शासकीय कर्मचारी म्हणून गणले जाणार नाही. त्यांना करार पध्दतीने केलेल्या सेवेच्या आधारे शासकीय सेवेत सामावमून घेतले जाणार नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 सप्टेंबर 2024 (सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत) ही आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता हा कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद पुणे, यशवंतराच चव्हाण भवन, नवीन प्रशासकीय इमारत, ३ रा मजला, वेलस्ली रोड, SGS मॉल समोर, पुणे-१ हा आहे. उमेदवारांची भरती प्रक्रिया मुलाखत (Interview) व्दारे केली जाणार आहे. तर मुलाखतीची तारीख ही 19 सप्टेंबर 2024 ही आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.