होमगार्ड भरती 2024 ला आजपासून सुरुवात! | पात्रता – 10वी उत्तीर्ण | आजचं ऑनलाईन अर्ज करा | Maharashtra Homeguard Bharti 2024

Maharashtra Homeguard Bharti 2024 : राज्यातील जास्तीतजास्त नागरीकांना सैनिकी, तसेच आपतकालीन मदतकार्याचे, कायदा व सुव्यवस्था सुरळित राखण्याचे प्रशिक्षण देवून जबाबदार व शिस्तप्रिय नागरीक घडविणे हा होमगार्ड संघटनेचा उददेश आहे. या संघटनेत अनेक पदे रिक्त झाली आहेत. ती पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा होमगार्ड कार्यालय व्दारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल तर ही उत्तम संधी आहे. या भरतीची पुर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

होमगार्ड भरतीचे नियम व अटी :
1] होमगार्ड पात्रतेचे निकष :-
अ) शैक्षणिक पात्रता कमीत कमी 10वी उत्तीर्ण (SSC) असणे आवश्यक आहे.
ब) शारिरीक पात्रता :
▪️वय 20 वर्षे पुर्ण ते 50 वर्षांच्या आत.
▪️उंची पुरुषांकरीता 162 से.मी., महिलांकरीता 150 से.मी.
▪️छाती (फक्त पुरुष उमेदवारांकरीता ) (न फुगविता किमान 76 से.मी. कमीत कमी 5 सेमी फुगविणे आवश्यक)
2] शारिरीक क्षमता चाचणी : उमेदवारांना प्रत्येक शारिरिक चाचणी प्रकारात ४०% गुण मिळवून पात्र होणे आवश्यक असल्याने एका चाचणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या धावणे व गोलफेक चाचण्या घेतल्या जाणार नाहीत.
अधिक माहिती व pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :
1) रहीवासी पुरावा, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र
2) शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र (10वी मार्कशीट / प्रमाणपत्र)
3) जन्मदिनांक पुराव्याकरीता SSC बोर्ड प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला.
4) तांत्रिक अहर्ता धारण करीता असल्यास तत्सम प्रमाणपत्र,
5) खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र.
6) 3 महीन्याचे आतील पोलीस चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र

ऑनलाईन अर्ज भरणे संदर्भात सूचना :
1) होमगार्ड नोंदणीचे अर्ज वरती दिलेल्या संकेतस्थळावर फक्त इंग्रजी या भाषेमधून भरावयाचा आहे.
2) उमेदवार ज्या भागातील रहीवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाणेच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्हयात अर्ज दाखल करता येईल.
3) अर्ज SUBMIT केल्यावर Print Registration Form या मेनू मध्ये जावून त्याची छायांकीत प्रत काढावयाची आहे. त्यावर उमेदवारांनी भरलेला सर्व मजकूर छापून येईल. त्यावर आपला वर्तमानातील एक फोटा चिटकवावा, मराठी मधील नाव उमेदवारानी स्वतः पेनानी लिहावयाचे आहे. इतर कोणतीही माहिती उमेदवारानी भरू नये.
4) दिलेल्या दिनांकला कागदपत्र पडताळणी व शारिरिक क्षमता चाचणी करीता येताना सर्व आवश्यक कागदपत्रांच्या उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रति अर्जासोबत जोडाव्यात. अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेवून यावे. दोन फोटो व मुळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणीकरीता बंधनकारक राहील.
◾अंतिम गुणवत्ता यादी याच संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाईल.

होमगार्ड सदस्यत्वाचे फायदे :
1) सैनिकी गणवेश परीधान करणेचा मान व विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण
2) ३ वर्षे सेवापुर्ण होमगार्डना राज्य पोलीस दल, वनविभाग, अग्निशमन दलामध्ये ५% आरक्षण.
3) प्रथमोपचार, अग्निशमन, विमोचन या सारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी.
4) गौरवास्पद कामगिरी केल्यास विवीध पुरस्कार/पदके मिळविण्याची संधी.
5) स्वतःचा व्यवसाय/शेती इ. सांभाळत देशसेवा करण्याची संधी.


error: Content is protected !!