महाराष्ट्र होमगार्ड भरतीला सुरुवात! | आजपासून ऑनलाईन अर्ज सुरू! | शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण.

पुर्ण जाहिरात
(भरतीचे नियम व अटी)
येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

राज्यातील काही जिल्ह्यात होमगार्ड भरतीला सुरुवात झाली असून आज दिनांक 15 जुलै 2024 पासून सुरुवात झाली आहे. शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. सातारा जिल्हा होमगार्ड भरतीला सुरुवात झाली आहे. 31 जुलै 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे. होमगार्ड भरतीचे महत्वाचे नियम व अटी : होमगार्ड सदस्यत्व – महाराष्ट्रातील होमगार्ड संघटना ही शासन संचलित पुर्णतः मानसेवी तत्वावर आधारीत आहे. या संघटनेचे सदस्य होणे म्हणजे कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा रोजगार नाही. हे सदस्यत्व तीन वर्षांकरीता दिले जात असून आपण संघटनेसाठी दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेवर पुढे ३-३ वर्षांच्या टप्प्याने वयाच्या ५८ वर्षांपर्यंत पुर्णनोंदणीकृत करता येते..

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

होमगार्ड सदस्यांचे कर्तव्य होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही. पोलीस दलाच्या मागणी प्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखणे कामी पोलीस दलासोबत बंदोबस्त कर्तव्य, आपतकालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन, विमोचन, पूरविमोचन तसेच रोगराई / महामारीकाळात, संपकाळात प्रशासनांस मदतकार्य अशी कर्तव्ये दिली जातात. होमगार्ड ना देय भत्ते होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन रु. ५७०/- कर्तव्य भत्ता व रु. १००/- उपहारभत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळात रु. ३५/- खिसाभत्ता व रु. १००/- भोजनभत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी रु. ९०/- कवायत भत्ता दिला जातो.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही परंतू अत्यावश्यक प्रसंगी बंदोबस्त कर्तव्याकरीता विनाकारण अनुपस्थित राहणाऱ्या कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्या / आदेशांचे पालन न करणाऱ्या होमगार्ड सदस्यांवर मुंबई होमगार्ड अधिनियम १९४७ कलम ७ (१) अन्वये बडतर्फ किंवा रु. २५०/- इतका दंड। तीन महीन्याची साधी कैद अशी शिक्षा करण्याची तरतूद आहे. ५.होमगार्ड नोदणी – होमगार्ड नोदणी करीता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. सदस्यत्व मिळणेकरीता काणत्याही इतर मार्गाचा (वशिला किंवा लाच) अवलंब करु नये. याकरीता कोणीही लाच / पैशाची मागणी केल्यास अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय, सातारा किंवा मा. जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधिक्षक सातारा यांचेशी संपर्क साधावा. या भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक वरती दिली आहे.


error: Content is protected !!