होमगार्ड भरती 2024 संपूर्ण माहिती | येथे क्लीक करा येथे क्लीक करा |
सरकारी नोकरी सर्व जाहिराती | येथे क्लीक करा |
मोठ्या होमगार्ड भरतीची वाट पाहत असाल तर तुमची प्रतिक्षा संपणार आहे. महाराष्ट्र होमगार्ड मध्ये एकूण 09000 पदांची भरती होणार आहे असे महाराष्ट्र होमगार्डचे महासमादेशक रितेश कुमार यांनी माहिती दिली आहे. सध्या होमगार्डना कामाच्या दिवसाचे 670 रुपये मानधन दिले जाते, तर 100 रुपये आहार भत्ता दिला जातो. पोलिसांच्या बरोबरीने काम करणाऱ्या होमगार्ड जवानांना नागरिक व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून मान मिळावा, अशी अपेक्षा असते. काही अधिकारी अर्वाच्च भाषा वापरून त्यांचा अपमान करतात, तर काही वेळा रस्त्यावर थांबून वाहतूक पोलिसांना मदत करणाऱ्या होमगार्डना वाहनधारकांकडून अपमानास्पद वागणूक मिळते. यासाठी योग्य तो मान व पोटपाणी चालण्यासाठी योग्य धन (पगार) मिळावा, अशी जवानांची अपेक्षा आहे. आहार भत्ता वाढवण्याची मागणी सुरू होती. त्यानुसार आहार भत्त्यात वाढ करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, लवकरच यात वाढ होणार आहे. होमगार्ड भरती 2024 बद्दल नवीन माहितीसाठी आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट देत रहा.