बँकिंग क्षेत्रात नोकरी पाहिजे? IDBI बँक मध्ये तब्बल 01000 जागांसाठी भरती सुरू! | वेतन – 29,000 ते 31,300 रूपये.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

बँकिंग क्षेत्रात तब्बल 1,000 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजेच IDBI BANK (आयडीबीआय बँक) येथे रिक्त पदे भरली जात आहेत. या भरती मध्ये कार्यकारी – विक्री आणि संचालन ही एकूण 1000 पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. ज्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदवीधर व संगणकाचे कार्य ज्ञान असेल ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन / मानधन: पहिले वर्ष- ₹२९०००/- दरमहा, दुसरे वर्ष- ₹३१३००/- दरमहा भेटणार आहे. ज्या उमेदवारांचे वय 20 – 25 वर्षे आहे ते पात्र ठरतील. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांसाठी बँकेने निर्दिष्ट केलेल्या किमान पात्रता निकषांची पूर्तता केली पाहिजे. कृपया लक्षात घ्या की येथे नमूद केलेले पात्रता निकष हे या पदासाठी अर्ज करण्यासाठी मूलभूत निकष आहेत. उमेदवारांनी ऑनलाइनमध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांची ओळख आणि पात्रतेच्या समर्थनार्थ मूळ स्वरूपात श्रेणी, राष्ट्रीयत्व, वय, शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव, शारीरिक अपंगत्व इत्यादी संबंधित कागदपत्रे अनिवार्यपणे सादर करणे आवश्यक आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

07 नोव्हेंबर 2024 पासून या भरतीला सुरुवात झाली आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 नोव्हेंबर 2024 ही आहे. अर्ज फी भरणेची तारीख (केवळ ऑनलाइन मोड): नोव्हेंबर ०७, २०२४ – १६ नोव्हेंबर २०२४. ऑनलाइन चाचणीची तात्पुरती तारीख (OT): 01 डिसेंबर 2024 (रविवार). या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात वाचून घ्या.


error: Content is protected !!