नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदासाठी भरती – 284 पदांसाठी अर्ज करा | IGR MAHARASHTRA BHARAT 2025

IGR MAHARASHTRA BHARAT 2025 : महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखालील नोंदणी व मुद्रांक विभागाने पुणे येथून गट-ड संवर्गातील शिपाई पदासाठी भरतीची अधिकृत प्रक्रिया सुरू केली आहे. एकूण 284 जागा या भरतीत समाविष्ट असून अर्ज फक्त ऑनलाइन स्वरूपात स्वीकारले जाणार आहेत. या भरतीद्वारे शासकीय सेवेत सहभागी होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
IGR MAHARASHTRA BHARAT 2025 : The Registration and Stamps Department under the Government of Maharashtra has started the official recruitment process for the post of Peon in Group-D cadre from Pune. A total of 284 posts are included in this recruitment and applications will be accepted only in online format.

विभागाचे नाव: नोंदणी व मुद्रांक विभाग, महाराष्ट्र शासन
पद: शिपाई (गट-ड)
रिक्त पदे: 284
भरती प्रकार: राज्य सरकारी सेवा
श्रेणी: गट-ड
शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
पगार व भत्ते: या पदासाठी निश्चित वेतनश्रेणी ₹15,000 ते ₹47,600 (एस-०१) असून, त्यासोबत लागू भत्त्यांचा समावेश होईल.
◾अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली उपलब्ध आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज पद्धती : या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
वय : अर्ज भरताना वयोमर्यादा किमान 18 वर्षे आणि कमाल 38 वर्षे असावी. मागासवर्गीय, अनाथ, विधवा आणि इतर आरक्षित प्रवर्गांसाठी शासन नियमांनुसार सवलत दिली जाणार आहे.
अर्ज प्रक्रिया व शुल्क:
▪️परीक्षा शुल्क:
1) खुला प्रवर्ग – ₹1000/-
2) मागासवर्गीय – ₹900/-
3) माजी सैनिक – पूर्णतः शुल्कमुक्त
(बँकेचे अतिरिक्त शुल्क उमेदवाराच्या जबाबदारीचे असेल)
ऑनलाइन अर्ज लिंक:
उमेदवारांनी खालील अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावा:
https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25
महत्त्वाच्या तारखा:
▪️अर्ज सुरु होण्याची तारीख: 22 एप्रिल 2025
▪️अर्ज करण्याची अंतिम मुदत: 10 मे 2025, रात्री 11:59 वाजेपर्यंत
सूचना व अटी:
1) उमेदवारांनी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे शासन निर्देशांनुसार सादर करणे अनिवार्य आहे.
2) भरती प्रक्रियेत स्पर्धात्मक परीक्षा, गुणांची गणना, आणि निवड निकषांचा अंतिम अधिकार विभागप्रमुखांकडे राहील.
3) भरतीसंबंधी सर्व अपडेट्स खालील संकेतस्थळांवर वेळोवेळी प्रसिद्ध केल्या जातील:
▪️https://rfd.maharashtra.gov.in
▪️https://igrmaharashtra.gov.in
◾ अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!