Indian Army Women Agniveer Bharti 2025 : अग्निपथ स्कीम अंतर्गत 2025-26 या वर्षाच्या भरतीसाठी महिला अग्निवीर जनरल ड्यूटी (महिला मिलिटरी पोलिस) प्रवेशासाठी निवड चाचणीसाठी महिला उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक व उत्सुक महिला उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 10वी उत्तीर्ण महिला उमेदवारांना सरकारी नोकरी तसेच देशसेवा करण्याची चांगली संधी आहे. भरतीची अधिकृत PDF जाहिरात भारतीय सैन्य (Indian Army) द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरती बद्दलची आवश्यक माहिती, pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
Indian Army Women Agniveer Bharti 2025 : Applications are being invited online from female candidates for the selection test for admission to Women Agniveer General Duty (Women Military Police) for the recruitment year 2025-26 under the Agneepath Scheme.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : भारतीय सैन्य (इंडीयन आर्मी) द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : महिला अग्निवीर जनरल ड्यूटी (महिला मिलिटरी पोलिस).
◾शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण / जे महिला उमेदवार इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेत बसले आहेत आणि निकाल जाहीर होण्याची वाट पाहत आहेत ते देखील अर्ज करण्यास पात्र आहेत जर त्यांनी इतर सर्व आवश्यक पात्रता पूर्ण केल्या असतील. तथापि, अशा उमेदवारांची निवड तेव्हाच केली जाईल जेव्हा ते भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात मूळ मार्कशीट जमा करतील. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾इतर पात्रता : ज्या स्त्रिया विधवा, घटस्फोटित किंवा कायदेशीररित्या विभक्त आहेत त्या देखील पात्र आहेत जर त्यांना इतर सर्व पात्रता निकषांची पूर्तता करण्याच्या अधीन कोणतीही मुले नसतील.
◾मासिक मानधन / वेतन : 30,000 रूपये.
◾अधिकृत pdf जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली पहा.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 17 वर्ष 6 महिने ते 21 वर्ष दरम्यान वय असलेले उमेदवार.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
◾अर्ज शुल्क : 250/- रुपये.
◾अंतिम निकाल अधिकृत वेबसाईट www.joinindianarmy.nic.in वर घोषित केला जाईल. उमेदवाराला वेगळे पत्र पाठवले जाणार नाही. तिचा निकाल तपासणे आणि पाठवण्याच्या औपचारिकतेसाठी ARO कडे तक्रार करणे ही उमेदवाराची जबाबदारी आहे.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 10 एप्रिल 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.