IPPB Executive GDS Bharti 2025 : India Post Payments Bank (IPPB) मध्ये (कार्यकारी) ग्रामीण डाक सेवक पदांसाठी नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. बँकेच्या विविध कार्यालयांमध्ये 348 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले जात आहेत. या भरतीत कार्यकारी (Executive – GDS) पदासाठी निवड होणार असून इच्छुक उमेदवारांना ही एक उत्तम सरकारी नोकरीची संधी आहे. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
IPPB Executive GDS Bharti 2025 : या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 9 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2025 आहे. उमेदवारांनी पात्रता निकष तपासूनच अर्ज करावा. अन्यथा अर्ज त्वरित नाकारला जाऊ शकतो. या भरतीसाठी पदवीधर उमेदवार पात्र आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 30,000 रुपयांचे वेतन मिळेल. उमेदवारांचे वय अर्जाच्या दिवशी 20 ते 35 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. अर्ज शुल्क 750 रुपये निश्चित करण्यात आले आहे. Pdf जाहिरात खाली दिली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
या पदावर काम करणाऱ्यांना बँकेच्या विविध उत्पादने आणि सेवा यांची विक्री करून महसूल लक्ष्य पूर्ण करावे लागेल. ग्राहकांसाठी मोहिमा राबवून आर्थिक साक्षरता वाढवणे, GDS प्रशिक्षण सत्रांमध्ये सहभाग घेणे, पोस्ट ऑफिस अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधणे आणि नवीन ग्राहक मिळवणे हे या पदाचे मुख्य जबाबदाऱ्या असतील. ही नोकरी संपूर्ण भारतभर उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि वेळेत अर्ज करावा. अधिक माहिती, PDF जाहिरात आणि अर्जाची लिंक बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
