पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
नमूना अर्ज | येथे क्लीक करा |
महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग अंतर्गत महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ येथे कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता (स्थापत्य) ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये 01 पदे भरली जाणार आहेत. जे उमेदवार पुणे (Jobs in Pune) येथे नोकरी शोधत असतील त्यांना चांगली संधी आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन / ऑनलाइन (ईमेल) व्दारे अर्ज करू शकणार आहेत.
नियम व अटी : करार पध्दतीवर नेमणुकीकरिता अर्ज करते वेळी सेवानिवृत्त अधिकारी / अभियंता यांचे वय ६४ वर्षा पेक्षा अधिक नसावे. अर्ज करणाऱ्या सेवानिवृत अधिकारी अभियंत्यां विरुध्द कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी व न्यायालयीन प्रकरण प्रातंचित नसावी यायबात अर्जदारांनी ज्या कार्यालयातून सेवानिवृत्त झालेले आहे, त्या संबंधीत कार्यालयाकडून तसे प्रमाणपत्र घेण्यात वावे. करार पध्दतीने नियुक्त झालेल्या अर्जदारास आवश्यक प्रसंगी दौरा करावा लागल्यास त्यांना त्यांच्या निवृत्तीवेळाच्या चेतनमानास अनुसरुन प्रवास भत्ता व दैनिक भत्ता अनुज्ञेय राहील.
नियुक्ती प्राधिकारी (अधीक्षक अभियंता) यांना विशेष परिस्थितीत कोणत्याही वेळी करार पध्दतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहील. करार पध्दतीने नियुक्त झालेल्या अर्जदारास नेमून दिलेले काम समाधानकारक नसल्यास कोणतेही सबब कारण न देता त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल. करार पध्दतीने नियुक्त झालेल्या अर्जदारास नेमून दिलेली कामे पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधीत व्यक्तीची राहील व तसे बंधपत्र / हमीपत्र त्यांच्याकडून घेण्यात येईल. 13 सप्टेंबर 2024 ही अर्ज मागविण्याची अंतिम दिनांक आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता: जलसंपदा विभाग कार्यकारी अभियंता, उजनी कालवा विभाग क्र. ९, मंगळवेढा-४१३३०५. ऑनलाईन अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता: ujjanimangalwedha@gmail.com अधिक माहितीसाठी वरील दिलेली PDF जाहिरात वाचा.