पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता, दक्षिण कोंकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदूर्गनगरी या कार्यालयामार्फत सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प विभागीय पथक, आंबडपाल या विभागांतर्गत पाटबंधारे प्रकल्पांच्या कामाकरीता नामनिर्देशित उप अभियंता / अधिकारी (स्थापत्य) संवर्गातील पदे करार पध्दतीने भरणेसाठी पात्र सेवानिवृत्त अधिकारी / अभियंता यांचेकडून विहित नमुन्यातील अर्ज खालील नमूद केलेल्या ठिकाणी व्यक्तीशः किंवा टपालाने दि. 25 जुलै 2024 रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत पोहोचतील अशा बेताने संबंधित विभागास पाठविण्यात यावेत.
या मुदतीनंतर येणारे कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विभागीय कार्यालयात मध्यम प्रकल्पाकरीता क्षेत्रीय स्थळी कामावर निरीक्षण करणे इ. साठी तसेच मोठे, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पांकरीता बांधकामाची अंदाजपत्रके तयार करणे, सर्वेक्षण, निविदा, कागदपत्रे तयार करणे व प्रकल्प, क्षेत्रीय स्थळी कामावर देखरेख करणे इ. साठी तसेच पाटबंधारे प्रकल्पांच्या योजनांच्या निर्मितीसाठी करारपध्दतीने एकत्रित उप अभियंता /अधिकारी (स्थापत्य) यांच्या सेवा विवक्षित कामासाठी या नवीन पदांची भरती केली जात आहे.