पुर्ण PDF जाहिरात 1 | येथे क्लीक करा |
पुर्ण PDF जाहिरात 2 | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही भरती प्रक्रिया तुमच्यासाठी चांगली संधी आहे. अहमदनगर जिल्हा सहकारी बँक मध्ये जनरल मॅनेजर (संगणक), मॅनेजर (संगणक), डेप्युटी मॅनेजर (संगणक), इनचार्ज प्रथम श्रेणी (संगणक), क्लेरिकल, वाहनचालक (सबॉर्डिनेट ‘ए’), सुरक्षा रक्षक (सबॉर्डिनेट ‘बी’) ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये तब्बल 700 पदे भरली जात आहेत. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत.
ज्या उमेदवारांची जाहिरातीनुसार आवश्यक पात्रता व ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती, परिक्षा शुल्क, मूळ कागदपत्रांच्या आधारे परिपूर्ण सिध्द होईल, अशाच उमेदवारांचा विचार भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्याकरीता करण्यात येईल. जाहिरातीत नमूद केलेली संपूर्ण अर्हता, ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती व मूळ कागदपत्र तपासणीच्या वेळी सादर केलेली कागदपत्रे यामध्ये तफावत आढळल्यास उमेदवाराची निवड भरतीच्या कुठल्याही टप्यावर रद्द करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. ऑनलाईन अर्ज केला अथवा विहित अर्हता धारण केली म्हणजे परिक्षेस / कागदपत्र पडताळणीस बोलविण्याचा अथवा नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला आहे असे नाही.
निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार विहित अर्हता धारण न करणारा आढळल्यास, खोटी माहिती पुरविल्यास, एखाद्या अर्जदाराने त्याचा निवडीसाठी निवड समितीवर प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष दबाव आणला अथवा गैरप्रकाराचा अवलंब केल्यास त्यास निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल. तसेच नियुक्ती झाली असल्यास, कोणतीही पूर्वसूचना न देता त्याची नियुक्ती समाप्त करण्यात येईल व त्याच्या विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 13 सप्टेंबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 सप्टेंबर 2024 ही आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.