Jilha Nyayalay Bharti 2025 : सरकारी नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. जिल्हा न्यायालय मधील रिक्त पदांसाठी निवड यादी तयार करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी अशिक्षित / 7वी / 10वी / 12वी उमेदवारांना सरकारी विभागात नोकरीची सुवर्णसंधी आहे. भरतीची जाहिरात जिल्हा व सत्र न्यायालय द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. भरतीची आवश्यक माहिती, अधिकृत जाहिरात व अर्ज खाली पहा.
Jilha Nyayalay Bharti 2025 : If you are looking for a government job, this is a great opportunity. Applications are being invited from eligible candidates to prepare a selection list for the vacant posts in the District Court.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : जिल्हा व सत्र न्यायालय द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : जिल्हा न्यायालय सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.
◾पदाचे नाव : सफाई कामगार (पूर्णवेळ)
◾शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी कुठलीही शैक्षणिक पात्रता नाही. अशिक्षित / 7वी / 10वी / 12वी किंवा इतर शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾इतर पात्रता :
1) उमेदवार भारताचा नागरिक असावा.
2) सुदृढ शरीरयष्टी आणि सफाई कामगार पदाचे समारूप काम करण्याची योग्यता असणारा.
◾मासिक वेतन : 15,000 ते 46,600 रुपये पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व पुर्ण माहिती खाली पहा.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत
◾वयोमर्यादा : 18 ते 43 वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾एकूण पदे : 01 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : जिल्हा व सत्र न्यायालय रत्नागिरी.
◾उमेदवारांनी अर्जासोबत खालील कागदपत्रांच्या सत्यप्रती सादर कराव्यात :
1) जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र एस. एस.सी. बोर्ड प्रमाणपत्र (School Leaving Certificate/Birth Certificate issued by Competent Authority/ Board Certificate of SSC)
2) शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र,
3) शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पूर्वानुभव असल्यास त्या संबंधीचा संबंधित कार्यालयाचा दाखला.
4) जाहिरात प्रसिध्दी नंतरची तारीख असलेली दोन प्रतिष्ठीत व्यक्तींनी दिलेले चारित्र्य संपन्नतेविषयीचे प्रमाणपत्र. (त्यांचा पत्ता, फोन नंबर व शिक्यासह) (परिशिष्ट ब)
5) लहान कुटुंबाबाबत व फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे किंवा फौजदारी न्यायालयाने शिक्षा ठोठावली नसल्याचे किंवा शिस्तभंगाची कार्यवाही झालेली नसल्याचे तसेच जाहिरातीत नमुद सर्व सूचना व अटी मान्य असल्याचे स्वयं घोषणापत्र. (परिशिष्ट क)
6) सक्षम अधिकाऱ्याने प्रदान केलेला जातीचा दाखला. (केवळ मागासवर्गीयांसाठी)
7) उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास, त्याच्या कार्यालयाचे ना-हरकत प्रमाणपत्र.
8) विवाहित महिला उमेदवाराच्या बाबतीत जर तिने लग्नानंतर तिचे नाव बदलेले असे तिच्या नावाच्या बदलाबाबत दस्तऐवज उदाहरणार्थ शासकीय राजपत्र, सक्षम प्राधिकरणाने जारी केलेल्या विवाह प्रमाणपत्राची प्रत इत्यादी.
9) अर्जामध्ये दिलेल्या इतर माहिती संदर्भातील आवश्यक कागदपत्रे.
10) न्यायालयाचे प्रशासनाने मागणी केल्यास इतर कोणतेही दस्तऐवज सादर करणे अनिवार्य आहे.
11) चारित्र्य दाखल्यां व्यतिरिक्त अन्य कोणतेही मूळ कागदपत्र किंवा प्रमाणपत्र अर्जासोबत जोडण्यात येऊ नयेत.
◾विहित नमून्यात नसलेला आणि अपूर्ण माहिती असलेला अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
◾उमेदवाराने अर्ज भरताना संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी (असल्यास), जन्मतारीख त्यांच्याजवळ उपलब्ध असलेल्या वैध कागदपत्रानुसार अचूक रित्या नमूद करावे.
◾मुलाखतीसाठी बोलावण्यात येणाऱ्या उमेदवारांनी अर्ज सादर करतेवेळी दाखल केलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रती पडताळणीसाठी सोबत आणाव्यात.
◾उमेदवाराने जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पात्रता, अटी आणि निकष पूर्ण केले असतील अशा उमेदवारांचे अर्ज पुढील प्रक्रीयेकरीता योग्य ठरविणेत येईल.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 15 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत फक्त अर्ज करू शकतात.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा. प्रबंधक, जिल्हा न्यायालय, रत्नागिरी खारेघाट रोड, ता.जि.रत्नागिरी 415612.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.