Jilha Parishad Bharti 2024 : जिल्हा परिषद च्या आस्थापनेवर पॅनल वरील विवीध रिक्त पदांची नियुक्ती करावयाची आहे. तरी सदर पदाकरिता शैक्षणिक अर्हता, अनुभव आणि मानधन आणि इतर अटी व शर्ती पालन करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. जिल्हा परिषद रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा) जिल्हा परिषद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर pdf जाहिरात खाली दिली आहे.
Jilha Parishad Bharti 2024 : Various vacancies on the panel are to be appointed on the establishment of Zilla Parishad. However, interested candidates who fulfill the educational qualification, experience and salary and other terms and conditions for the said post should submit their applications at the earliest.
◾भरती विभाग : जिल्हा परिषद द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : जिल्हा परिषद सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
◾पदाचे नाव : खाली देण्यात आलेली pdf जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : या भरती मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 15,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव : पॅनल वरील विधीतज्ञ.
◾व्यावसायिक पात्रता :
1] एल.एल.बी किंवा त्यापेक्षा जास्त.
2] बार कॉन्सील ऑफ महाराष्ट्र अँड गोवा किंवा बार कौन्सील ऑफ इंडिया येथील नोंदणी.
3] अनुभव न्यायालयात वकील व्यवसाय केल्याचा १० वर्षाचा अनुभव.
◾रिक्त पदे : 05 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : अमरावती (Jobs in Amravati)
◾सादर करावयाची कागदपत्र :
1} शैक्षणीक पात्रतेचे प्रमाणपत्र.
2} बार असोसिएशन परवाना.
3} अनुभव प्रमाणपत्र.
4} रहिवाशी प्रमाणपत्राच्या स्व साक्षांकित प्रमाणपत्र.
◾यापुर्वी जिल्हा परिषदेच्या वकील पॅनल वर असल्यास त्यांच्या कामांचे मुल्यमापन करुन समिती निर्णय घेतील.
◾जिल्हा स्तरावरील व तालुकास्तरावरील व उच्च न्यायालय नागपुर न्यायालयाकरिता स्वतंत्रपणे अर्ज करणे बंधनकारक राहिल.
◾अमरावती जिल्हा परिषदेची न्यायप्रविष्ठ प्रकरणे चालविण्याकरिता वकील पॅनलसाठी जिल्हा परिषद अमरावतीने कामगार औद्योगिक /जिल्हा व सत्र न्यायालय / अप्पर आयुक्तांकडील अपील प्रकरणे तसेच मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मा. उच्च न्यायालय, मा. सर्वोच्च न्यायालय तसेच इतर वरिष्ठ मुख्यालयीन न्यायपीठांमध्ये जिल्हा परिषद अमरावती येथील तालुका स्तरावरील तसेच वरिष्ठ मुख्यालयीन न्यापिठांमध्ये जिल्हा परिषद अमरावतीने वकील पॅनलवर नियुक्त करण्यासाठी / नियुक्त केलेल्या वकीलांसाठी ठरवुन दिलेल्या अटी व शर्ती खालील प्रमाणे आहे.
◾ज्या वकीलांना जिल्हा परिषद अमरावती तर्फे नियुक्ती दिली असेल त्यांना नियुक्ती दिल्याच्या आदेशाचे दिनांकापासुन अमरावती जिल्हा परिषदेच्या विरुध्द असलेले कोणतेही न्यायालयीन प्रकरण /दावा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे स्विकारता येणार नाही.
◾जिल्हा परिषदेचे न्यायालयीन प्रकरणे साधारणः क्रमवारीने देण्यात येतील परंतु न्यायालीन प्रकरणामध्ये वकील नियुक्तीबाबत उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा) अमरावती यांचा निर्णय अंतर्गत राहील.
◾अमरावती जिल्हा परिषदेचे नियुक्त वकील म्हणुन खालील प्रमाणे मानधनासाठी ते पात्र राहतील व इतर कोणताही जादा खर्च मंजुर केल्या जाणार नाही.
◾वकील फी व सादील किरकोळ खर्चाची रक्कम संबंधित दाव्याचे अंतिम न्यायनिर्णय नंतर संबंधित खातेप्रमुख यांचेकडून अदा केले जाईल.
◾प्रत्येक न्यायालयीन खर्चाबाबत त्याची पावती / प्रमाणपत्र देयकासोबत जोडणे आवश्यक राहील. अशी पावती पडताळणी करतांना त्यास मंजुरी देणे किंवा नाकरणे किंवा दुरुस्ती मंजुरी देणे याबाबतचे अधिकार संबंधित खाते प्रमुखांना राहतील. याबाबत उत्पन्न झाल्यास अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. अमरावती यांना राहील.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 06 ऑक्टोबर 2024 पर्यंत फक्त अर्ज
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा) जिल्हा परिषद अमरावती.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.