जिल्हा परिषद अंतर्गत बांधकाम विभाग मध्ये भरती जाहीर! | Jilha Parishad Bharti 2024

Jilha Parishad Bharti 2024 : महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग नुसार जिल्हा परिषद अंतर्गत बांधकाम विभाग कडील कामकाजाच्या अंमलबजावणीसाठी रिक्त असलेली पदे भरावयाची आहेत. त्याकरिता खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीची जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी बांधकाम विभाग, जिल्हा परिषद पुणे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण pdf जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Jilha Parishad Bharti 2024 : According to the Government of Maharashtra, General Administration Department, vacant posts are to be filled for the implementation of the work of the Construction Department under the Zilla Parishad.

भरती विभाग : जिल्हा परिषद पुणे द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾ZP अंतर्गत बांधकाम विभाग मध्ये ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली उपलब्ध आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : ६५ पेक्षा अधिक नसावे.
भरती कालावधी : ११ महिन्यांचे करार पध्दतीने पदे भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव : सेवानिवृत्त शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता श्रेणी – २.
आवश्यक पात्रता : पदवीधर / पदविकाधारक शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता श्रेणी २, गट-ब रापत्रित अराजपत्रीत असणे आवश्यक आहे.
एकूण पदे : 02 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : पुणे. (Jobs in Pune)
◾उमेदवारने जाड फुलस्केप कागदावर स्वतःचे नांव (आडनांव प्रथम), जन्म दिनांक, वय, लिंग, पत्रव्यवहाराचा तपशिल माहितीसह अर्ज सादर करावा. अर्जाच्या वरील डाव्या बाजूस अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटविणेत यावा. व आपले स्वाक्षरीने साक्षांकित करणेत यावा.
अर्जासोबत खालील प्रमाणे कागदपत्रे साक्षांकित करुन जोडावीत : (अ) सेवानिवृत्त आदेशाची व कार्यमुक्त आदेशाची प्रत
(ब) सेवानिवृत्ती वेतन मंजूर पी.पी. ओ.ची प्रत
(क) शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र
(ड) संगणक अर्हता (MSCIT) उत्तीर्ण प्रमाणपत्र.
◾कंत्राटी शाखा अभियंता/ सहाय्यक अभियंता श्रेणी-२ यांची नियुक्ती ११ महिन्याच्या कालावधीसाठी करार तत्त्वावर करण्यात येईल. करार पध्दतीने नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधितास शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशानाचे/ सामावून घेण्याचे वा नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकारी/ हक्क नसेल.
◾नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीत कोणत्याही वेळी अशा अधिकाऱ्यांच्या करार पध्दतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकारी राहतील.
◾करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती, सोपविलेली सेवा पार पाडण्याच्या कामाती व्यत्यय निर्माण होईल, अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेली नसावी.
◾करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने गुंतलेले हितसंबंध जाहीर करणे आवश्यक राहील.
◾करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्र/ माहिती व आधार सामुग्रीबाबत गोपनियता पाळणे आवश्यक राहील.
◾करारपध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांच्यावर सोपविलेले कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक राहील. त्यांच्या कामकाजाबाबत नियुक्तीसाठी सक्षम असलेले प्राधिकारी वेळोवेळी आढावा घेऊन कामाचे मूल्यमापन करतील.
◾करारपध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी कोणत्याही प्रकारचे प्रशासकीय व वित्तीय अधिकारी प्रदान करता येणार नाहीत.
◾सदरचे पद कंत्राटी (करार) पध्दतीने भरावयाचे असल्याने शासकीय सेवकांच्या सेवा सवलती व आर्थिक लाभ याचा फायदा मिळणार नाही. तसेच कोणतेही कायदेशीर हक्क राहणार नाहीत.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 11 डिसेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : बांधकाम विभाग उत्तर, जिल्हा परिषद पुणे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


error: Content is protected !!