ZP Bharti 2024 : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या कालावधीसाठी मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये पात्र उमेदवारांची नियुक्ती करणेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. जिल्हा परिषद मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
ZP Bharti 2024 : Applications are invited for the appointment of eligible candidates in Marathi medium schools for the academic year 2024-25 under the Zilla Parishad Primary Education Department. However, healthy, willing and eligible candidates fulfilling the following eligibility criteria should submit their applications at the earliest.
◾भरती विभाग : जिल्हा परिषद द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 20,000 रूपये मासिक पगार दिला जाणार आहे.
◾अर्जदार हा संबंधित नियुक्तीकरिता शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा (शासकिय रुग्णालयाचे वैदयकिय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
◾PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 70 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : अर्जदारास कायमपदी नेमणूकीचा हक्क प्राप्त राहणार नाही. आवश्यकतेनुसार ही मुदत दिलेल्या कालावधीपूर्वी केव्हाही संपुष्टात करण्यात येईल.
◾पदाचे नाव : सेवानिवृत्त शिक्षक.
◾व्यावसायिक पात्रता : सेवानिवृत्त शिक्षक असणे आवश्यक आहे.
◾नोकरी ठिकाण : ठाणे. (Jobs in Thane)
◾सदर एकत्रित मानधनावर कंत्राटी पध्दतीने सेवानिवृत्त शिक्षक नेमणुका या पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये नियमित शिक्षक भरती होईपर्यंत करणेत येत आहेत. त्यामुळे अर्जदारास कायमपदी नेमणूकीचा हक्क प्राप्त राहणार नाही.
◾स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांमधील सेवानिवृत्त असलेले शिक्षक कंत्राटी शिक्षक पदासाठी अर्ज करण्यास पात्र राहतील.
◾जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याशी अर्जदारास करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक आहे.
◾वरील संपूर्ण प्रक्रिया मा. आयुक्त (शिक्षण) यांच्या नियंत्रणाखाली पूर्ण करण्यात येईल. सदर प्रकिये संदर्भात आवश्यकता असल्यास मा. आयुक्त (शिक्षण) यांनी अतिरिक्त सूचना निर्गमित केल्यास त्या सूचना संबंधित नियुक्ती केलेल्या शिक्षकांवर लागू राहतील.
◾उमेदवाराने सोबत दिलेल्या नमुन्यात कंत्राटी तत्त्वावर सेवानिवृत्त शिक्षक या पदासाठीचा अर्ज (परिशिष्ट-अ) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे यांच्या नावाने करावा. सदरचा अर्ज दि. २६/०७/२०२४ ते दि. ३१/०७/२०२४ या कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यत (सुटटीचे दिवस वगळून) ठाणे जिल्हयातील आपल्या लगतच्या/ सोयीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालय, पंचायत समिती अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड व शहापूर या कार्यालयात जमा करावेत व अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती पडताळणीसाठी सादर कराव्यात. सायंकाळी ५.०० नंतर आलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.