जिल्हाधिकारी कार्यालय भरती 2025 | Jilhadhikari Karyalay Bharti 2025

Jilhadhikari Karyalay Bharti 2025 : जिल्हाधिकारी कार्यालय येथील पुनर्वसन शाखा, मध्ये रिक्त पदाची नियुक्ती करावयाची आहे. सदर पदासाठी पात्र उमेदवारांकडून खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून अर्ज मागविणेत येत आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात अपर जिल्हाधिकारी कार्यालय द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. Pdf जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Jilhadhikari Karyalay Bharti 2025 : Vacant post is to be filled in the Rehabilitation Branch, District Collector's Office. Applications are invited from eligible candidates for the said post subject to the following terms and conditions.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : अपर जिल्हाधिकारी पुणे द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन : एकत्रित मानधन रुपये ८०,०००/- + ५,०००/- दुरध्वनी व प्रवास खर्च रुपये /- असे एकत्रित मानधन रुपये ८५,०००/- रुपये प्रतिमाह राहील.
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा

अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाइन (ई- मेल) / ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
भरती कालावधी : 11 महिन्याकरिता पुर्णतः कंत्राटी पध्दतीने भरण्यात येईल. विधी अधिकारी हे पद शासकीय कर्मचारी म्हणून गणले जाणार नाही.
पदाचे नाव : विधी अधिकारी (कंत्राटी).
इतर आवश्यक पात्रता :
(1) कायदयाची एल एल बी किंवा एल एल एम असणे आवश्यक आहे.
(2) उमेदवार हा सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधिश अथवा समकक्ष पदाचा असावा.
(3) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा कायद्याचा पदवीधर तसेच सनदधारक असणे आवश्यक आहे.
(4) विधी अधिकारी या पदासाठी वकील व्यवसायाचा किमान १० वर्षाचा अनुभव आवश्यक.
(5) उमेदवार महसूल तसेच पुनर्वसन अधिनियमांचे विषयाचे सखोल ज्ञान असावे सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इ. बाबत ज्ञानसंपन्न असणे आवश्यक, ज्यामुळे कायद्येविषयक कार्यवाही कार्यक्षमतेने पार पाडू शकेल.
(६) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक आहे.
एकूण पदे : 01 रिक्त पद भरणार आहे.
नोकरी ठिकाण : पुणे.
विधी अधिकारी यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या : (1) कार्यालयाकडे प्राप्त होणाऱ्या सर्व कायदेविषयक बाबींबाबत / न्यायालयीन प्रकरणी सल्ला देणे व न्यायालयीन प्रकरणे हाताळणे.
(2) महसूल विषयक परिच्छेदनिहाय अभिप्राय (Parawise Comments) तयार करणे /सेवाविषयक / प्रशासकीस बाबी / विभागीय चौकशी इ. तथा समकालीन कायद्याची प्रस्थापित स्थिती याबाबत सर्व प्रकरणी सल्ला देणे व ती प्रकरणे हाताळणे.
(3) प्रलंबित न्यायालयीन प्रकरण तत्परतेने निकाली काढण्यासाठी सरकारी वकीलाकडे पाठपुरावा करणे, जेथे शासनाचा प्रतिवादी आहे. अशा प्रकरणी सादर करावयाची प्रतिज्ञापत्र संबंधित अधिकाऱ्याच्या मदतीने तयार करणे.
(4) शपथपत्राचा मसूदा तयार करणे व त्यास सक्षम प्राधिकाऱ्याची मान्यता घेवून न्यायालयात विहित मुदतीत सादर होईल, याची दक्षता घेणे.
(५) जेथे शासनाच्या विरोधात न्यायालयाने निकाल दिलेला आहे, अशा प्रकरणांमध्ये न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करुन तदअनुषंगाने अपिल दाखल करण्याच्या संदर्भात उचित कार्यवाही करणे.
(६) अपिल करणे योग्य असल्यास व तसा निर्णय झाल्यास अपिलाचा मसूदा तयार करुन तो संबंधित सरकारी वकीलाकडे पाठविणे व अपिलाचा अंतिम निर्णय लागेपर्यंत पाठपुरावा करणे.
(७) सर्व न्यायालयीन प्रकरणांसाठी विभागीय स्तरावर नोडल ऑफिसर म्हणून काम पहाणे.
(८) विधि विषयक कामकाजाबाबत वेळोवेळी नेमन दिलेले कार्य विहीत मुदतीत पार पाडणे.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 30 जून 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालय, ए विंग, तळमजला, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, पिन कोड नंबर ४११००१.
◾ई- मेल पत्ता : dropune@gmail.com
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!