नोकरी शोधताय? जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत नवीन रिक्त पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांसाठी ही सरकारी विभागात काम करण्याची चांगली संधी आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 45,000 रुपये मासिक मानधन दिले जाईल. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 17 ऑक्टोबर 2025 आहे. पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच बार कॉन्सिल कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात येईल. Pdf जाहिरात व अर्ज खाली पहा.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
या भरतीसाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर आणि बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा यांच्याकडे नोंदणीकृत सनदधारक असावा. तसेच किमान 7 वर्षांचा वकीली अनुभव आवश्यक आहे. उमेदवारांना महसूल, सेवा, प्रशासनिक विषयक कायद्याचे ज्ञान असणे अपेक्षित आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांचे पुरेसे ज्ञानही आवश्यक आहे. वयोमर्यादा 45 वर्षे आहे. एकूण 1 पद भरले जाणार असून या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना इतर कोणतेही भत्ते लागू होणार नाहीत. नियुक्ती ही करार पद्धतीने होणार असून, शासकीय कर्मचारी म्हणून कोणताही दर्जा मिळणार नाही.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता: जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे (आस्थापना शाखा).
अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
◾ महत्त्वाचे मुद्दे:
▪️पदाचे नाव: विधी अधिकारी
▪️एकूण पदे: 1
▪️पगार: ₹45,000 प्रतिमहिना
▪️नोकरीचे ठिकाण: धुळे
▪️अर्ज पद्धत: ऑफलाईन
▪️शेवटची तारीख: 17 ऑक्टोबर 2025
◾अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचा आणि वेळेत अर्ज सादर करा.
