10वी उत्तीर्ण उमेदवारांची महानगरपालिका मध्ये भरती प्रक्रिया सुरू! | आजचं अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
नमूना अर्ज येथे क्लीक करा

10वी पास असाल आणि काम शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. चंद्रपुर शहर महानगरपालिका अंतर्गत डासोत्पत्तीस्थाने तपासणीस (पुरुष) पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 25 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीनें करावा लागणार आहे. अटी व नियम : पात्र उमेदवारांनी त्यांनी त्यांचे स्वतःचे अर्ज दि. १८/०६/२०२४ रोजी सकाळी १०.०० ते सायं. ५.०० वाजेपर्यंत चंद्रपुर शहर महानगरपालिका, चंद्रपूर कार्यालयातील आरोग्य विभागात प्रमाणित दाखल्यांसह (अटेस्टेड करून) स्वतः जमा करणे अनिवार्य राहील. तसेच, अर्ज सादर करतेवेळी सर्व मुळ प्रमाणपत्रे/दाखले सुध्दा पडताळणी करण्याकरीता सोबत ठेवणे अनिवार्य राहील.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांचे सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी अचूक नोदबावा. तसेच ते भरतीप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहील, याची दक्षता घ्यावी. अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे व कमाल वय ४५ वर्षे राहील. भरती प्रक्रिये दरम्यान ज्या-ज्या उमेदवारांना बोलविण्यात येईल, त्या-त्या वेळी त्यांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. तसेच सदर उपस्थितीकरीता कोणतेही मानधन अथवा प्रवास खर्च देय राहणार नाही.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

भरती प्रक्रिये दरम्यान उमेदवाराने चुकीची माहिती सादर केल्याचे, कोणतीही माहिती दडवून ठेवल्याचे, दबाव तंत्राचा वापर किंवा अनुचित मार्गाचा अवलंब केल्याचे आढळून आल्यास कोणत्याही टप्प्यावर त्याची उमेदवारी/नियुक्ती कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द करण्यात येईल. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र नमुना-अ या प्रपत्रात अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील. १९. भरती प्रक्रियेचे संपूर्ण अधिकार, पदे कमी-जास्त करणे, भरती प्रक्रिया रद्द करणे, अटी व शर्तीमध्ये बदल करणे व आवश्यकतेनुसार पदे घेण्याचे इत्यादी सर्व अधिकार आयुक्त, मनपा चंद्रपुर यांचेकडे राखून ठेवले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

error: Content is protected !!