Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University Bharti 2025 : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्यापीठ फंडातून खालील नमुद केलेल्या पदांवर नियुक्ती करण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांडून विहित नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विद्यापीठ मध्ये नोकरीची उत्तम संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University Bharti 2025 : Applications are invited online in the prescribed format from qualified candidates for appointment to the following posts from the University Fund at Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : विद्यापीठ मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदे : लाईफगार्ड, ग्रंथालय सहाय्यक, वरीष्ठ पुर्वलेखक, पुर्वलेखक, कुशल परिचर (संगणक दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी), महिला वैद्यकीय अधिकारी, कायदेशीर आणि माहितीचा अधिकार अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, विशेष ड्युटी (टीडीएस/जीएसटी) कार्यकारी, विशेष कर्तव्य (खरेदी), कुशल तज्ञ, पीएच.डी.मध्ये विशेष कर्तव्यावर कार्यकारी, विशेष सहाय्यक, विशेष सहाय्यक, विशेष सहाय्यक अधिकारी तांत्रिक सहाय्यक, तांत्रिक ऑपरेटर, क्रीडा प्रशिक्षक, प्रशिक्षित कनिष्ठ अभियंता, प्रशिक्षित सहाय्यक अभियंता, इंटर्नशिप को-ऑर्डिनेटर.
◾शैक्षणिक पात्रता : पदवीधर व इतर शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000 ते 50,000 रूपये मासिक मानधन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, अधिक माहिती व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 21 ते 45 वर्षे दरम्यान वय असलेले उमेदवार.
◾भरती कालावधी : 11 महिन्याच्या करार तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾एकूण पदे : 020 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : जळगाव. ( Jobs in Jalgaon)
◾ऑनलाईन विहित नमुन्यातील अर्ज कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर भेट देल्यावर Job वर उपलब्ध होईल. अर्हताधारक उमेदवारांनी अर्जात ई पध्दतीने दि. ११/०४/२०२५ पर्यंत माहीती भरावी. सदर अर्जाची एक प्रिंट घेवुन अर्जात नमुद शैक्षणीक अर्हता व अनुभव प्रमाणपत्राच्या स्वयंसाक्षांकीत प्रती त्या प्रिंट ला जोडून एक हार्डकॉपी विद्यापीठ कार्यालयास पोस्टाव्दारे/समक्ष कार्यालयीन वेळेत दि. १७/०४/२०२५ पर्यंत पोहोचतील अशा पध्दतीने सादर करावी.
◾पात्र व अपात्र उमेदवाराची यादी, मुलाखत वेळापत्रक इ. माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येईल, सदर वेळापत्रकानुसार पदनिहाय आवश्यक त्या दस्तऐवजांच्या मुळ प्रती सह मुलाखतीस उपस्थित रहावे.
◾सदर पदांसाठी मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक राहील.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 11 एप्रिल 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता (हार्ड कॉपी) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव (17 एप्रिल 2025).
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.