कोकण रेल्वे मध्ये 10वी / ITI / पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू! | Konkan Railway Bharti 2024

Konkan Railway Bharti 2024 : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) विविध विभागातील रिक्त पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज आमंत्रित करत आहे. या भरती मध्ये लोको पायलट (रेल्वे ड्रायवर), पॉइंट्समन, स्टेशन मास्टर व इतर पदे भरली जात आहेत. त्यासाठी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या, इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 10वी / ITI / पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना रेव्ले मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. भरतीची जाहिरात कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Konkan Railway Bharti 2024 : Konkan Railway Corporation Limited (KRCL) is inviting applications through online mode for various departmental vacancies. In this recruitment, Loco Pilot (Railway Driver), Pointsman, Station Master and other posts are being filled.

भरती विभाग : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. लगेच अर्ज करा.
भरती श्रेणी : सेंट्रल Goverment व्दारे ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : लोको पायलट (रेल्वे ड्रायवर), पॉइंट्समन, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर व इतर पदे भरली जात आहेत.
शैक्षणिक पात्रता : 10वी / ITI / पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ PDF जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : या भरती मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 18,000 ते 44,900 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज मागविण्याची पद्धती : या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा : 18 ते 36 वर्षे (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️सिनियर सेक्शन इंजिनिअर : इंजिनिअरिंग पदवी (Civil) असणे आवश्यक आहे.
▪️सिनियर सेक्शन इंजिनिअर : इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical / Electronics) पदवी असणे आवश्यक आहे.
▪️स्टेशन मास्टर : कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
▪️कमर्शियल सुपरवाइजर : कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
▪️ गुड्स ट्रेन मॅनेजर : कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
▪️टेक्निशियन III (Mechanical) : 1] 10वी उत्तीर्ण 2] ITI (Fitter / Mechanic Diesel / Mechanic (Repair and Maintenance of Heavy Vehicles) /Mechanic Automobile (Advanced Diesel Engine) / Mechanic (Motor Vehicle)/ Tractor Mechanic /Welder / Painter) या कोणत्या ITI ड्रेस मधून उत्तीर्ण.
▪️टेक्निशियन III (Electrical) : 1] 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 2] ITI (Electrician/Wireman/Mechanic ) असणे.
▪️ESTM-III (S&T) : 1] 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे 2] ITI (Electrician / Electronics Mechanic / Wireman) किंवा 12वी उत्तीर्ण (Physics & Maths) असणे आवश्यक.
▪️असिस्टंट लोको पायलट : 1] 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 2] ITI (Armature and Coil Winder / Electrician / Electronics Mechanic / इतर कोणत्या डिप्लोमा मधून उत्तीर्ण.
▪️पॉइंट्स मन : 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️ट्रॅक मेंटेनर-IV : 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
एकूण पदे : 0190 नवीन रिक्त पदासाठी भरती करण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : कोकण रेल्वे.
◾भरती प्रक्रियेच्या सर्व टप्प्यातील प्रवेश पूर्णपणे तात्पुरते असतील.
◾ज्या उमेदवारासाठी पात्रता प्रमाणपत्र आवश्यक असेल अशा उमेदवाराला परीक्षेत प्रवेश दिला जाऊ शकतो. तथापि, योग्य प्राधिकरणाने जारी केलेले पात्रतेचे आवश्यक प्रमाणपत्र DV दरम्यान सादर केले जाणे आवश्यक आहे, असे न केल्यास त्याची/तिची उमेदवारी नाकारली जाईल.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 07 ऑक्टोबर 2024 पर्यंत फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!