कोतवाल भरती 2023 सुरू! पात्रता – 4थी पास | वेतन – 15,000 रूपये | Kotwal Bharti 2023

Kotwal Bharti 2023 : 4थी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. कोतवाल पदाकरिता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी उमेदवारांनी विहीत नमुन्यात दोन पासपोर्ट साईज फोटोसह अर्ज आवश्यक कागदपत्र व पुराव्यासहीत कार्यालयीन वेळेत तहसिलदार, यांच्या कार्यालयात आस्थापणा शाखेत सादर करावेत व त्याबाबत पोच घ्यावी. अर्जाचा नमुना तहसिल कार्यालयातील आस्थापना शाखेत कार्यालयीन वेळेत व दिवशी उपलब्ध आहे. विहीत तारखे नंतर येणाच्या व अपूर्ण भरलेल्या अर्जाचा तसेच जाहीरनाम्याच्या पुर्वी सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी. या भरतीची जाहिरात तहसील ऑफीस द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Kotwal Recruitment 2023 : Tahsildar Office started recruitment for new posts. Candidates are Submit their Application Form Offline through Tahsildar Office.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾पदाचे नाव : कोतवाल (Kotwal)
◾शैक्षणिक पात्रता : 4थी उत्तीर्ण (4th Pass)
◾मासिकं वेतन : 15,000 रूपये (नवीन शासन निर्णय प्रमाणे)
◾वयोमर्यादा : 18 ते 40 वर्ष वयोमर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
◾भरती कालावधी : पर्मनंट (Permanent)
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 22 मे 2023 रोजी पासून अर्ज सुरू झाले आहेत. (कोतवाल भरती 2023)
◾अधिक माहितीसाठी खाली दिलेली महत्वाची माहिती वाचा.

???? कोतवाल भरती संबंधी वेळापत्रक :

1) अर्ज स्विकारण्याची तारीख 24 मे 2023 ते शेवटची तारीख 07 जुन, 2023 रोजी सांयकाळी 6.15 वाजेपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून)
2) अर्जाची छाननी दिनांक 08 जुन 2023 रोजी दुपारी 11.00 वाजेपासून तहसिल कार्यालय, मुल येथे करण्यात येईल. पात्र उमेदवारांनी यादीची प्रसिध्दी दिनांक 08 जुन 2023 रोजी तहसिल कार्यालय, मुल यांचे नोटीय बोर्डावर लावण्यांत येईल. (Kotwal Bharti 2023)
3) पात्र उमेदवारांची लेखी परिक्षा गुरवार दिनांक 15 जुन, 2023 रोजी सकाळी 11.00 ते 12.00 वाजेपर्यंत कर्मवीर महाविद्यालय, मुल येथे घेण्यात येईल. सर्व पात्र उमेदवारांनी आपले अर्जाची पोचपावतीसह परिक्षेस उपस्थित रहाणे बंधनकारक आहे.
4) सदर परिक्षेस आपणास कुठलेही पुस्तकी साहित्य, कॅल्क्युलेट, स्मार्ट वॉच, मोबाईल इत्यादी घेऊन बसता येणार नाही.
5) उमेदवारांची निवड लेखी परिक्षा मिळालेले एकुण गुण लक्षात घेवून गुणानुक्रमे करण्यात येईल. जाहिरात खाली दिली आहे.

जाहिरातयेथे क्लीक करा
वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुपयेथे क्लीक करा

???? कोतवाल भरतीसाठी पात्रता व अटी पुढील प्रमाणे :

1) उमेदवार ज्या साज्यासाठी अर्ज करीत आहे. त्या साम्यातील अंतर्भुत असणाच्या गावामधील रहिवासी असणे आवश्यक आहे. उमेदवाराने स्थानिक जागेचा रहिवासी असल्याबाबतचे (घर टॅक्स पावती / रेशनकार्ड/निवडणुक ओळखपत्र / मनरेगा अंतर्गत जॉबकार्ड / पॅन कार्ड / आधार कार्ड) यापैकी एखादा पुरावा जोडणे आवश्यक आहे. या व्यतिरीक्त इतर कुठलाही पुरावा ग्राह्य धरला जाणार नाही.
2) उमेदवाराचे वय जाहीरनाम्याच्या दिनांकाला कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 40 वर्ष या दरम्यान असावे. (पुराव्या दाखल जन्म तारखेचा दाखला / शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र / पॅन कार्ड / ड्रायव्हींग लायसन्स, यापैकी एखादा पुरावा जोडणे आवश्यक आहे.) या व्यतिरीक्त इतर कुठलाही पुरावा ग्राहय धरला जाणार नाही.
3) उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता इयता किमान 4 थी पास असणे आवश्यक आहे.
4) उमेदवार शारिरिक दुष्टया सक्षम असावा, नियुक्ती नंतर जिल्हा मेडिकल बोर्डाचे / चिकीत्सक प्रमाणपत्र 1 (एक) महिण्यात उमेदवाराला सादर करावे लागेल. त्याची जबाबदारी उमेदवाराची असेल. सदर प्रमाणपत्र 1 (एक) महिन्यात सादर न केल्यास सदरची निवड रद्द करण्यात येईल.
5) उमदवाराने वारिण्याबाबत सबंधित पोलीस स्लेशनचे पोलीस निरीक्षक यांचे प्रमाणपत्र नियुक्ती नंतर सादर करावे. सदर प्रमाणपत्र 1 (एक) महिन्यात सादर न केल्यास सदरची निवड रद्द करण्यात येईल.
6) सक्षम अधिकान्याचे जातीचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. जातीचे प्रमाणपत्र न जोडलेल्या अर्ज अपात्र ठरविण्यांत येईल. तसेच उमेदवाराला नियुक्ती झाल्यास नियुक्ती दिनांकापासुन सहा महिन्याचे आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. विहीत कालावधीत वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास पुर्व सुचना न देता कोणतेही कारन न देता कोणतीही वेळी नियुक्ती रद्द (समाप्त) करण्यात येईल.

???? महत्वाची माहिती :

1) अर्जासोबत कुठल्याही राजकीय पक्षाची शिफारस जोडलेली नसावी. अन्यथा आपला अर्ज अपात्र ठरविण्यांत येईल. तसेच निवड प्रक्रिये दरम्यान कुठलाही दबाव आणल्यास आपली निवड रद्द करण्यांत येईल.
2) अर्ज हा अर्जदारानेच वैयक्तिक स्वत: हजर राहुन सादर करावा. अर्ज पोस्टाव्दारे पाठविण्यात येवु नये. अपूर्ण माहीतीचे अर्ज रद्द करण्यात येईल. (कोतवाल भरती 2023) त्याबाबत कोणतेही पत्र व्यवहार करण्यात येणार नाही. अर्जामधील माहिती खोटी आढळल्यास अर्ज रद्द करण्यात येईल. किंवा नियुक्ती झाल्यानंतर ती रह करण्यात येईल.
3) कोतवाल हे पद अवर्गीकृत पद असुन शासनाने वेळोवेही निर्गमीत केलेल्या शासन निर्णयानुसार मानधन देय राहील. कोतवाल पदासाठी होणारी लेखी परिक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नांची राहील.
4) विहीत नमुन्यातील अर्जतहसिल कार्यालय, मुल येथे 50/- शुल्क भरून उपलब्ध होईल. (विहीत नमुन्यातील अर्जच स्विकारण्यात येईल.)
5) साज्या बाहेरील अर्जाचा विचार केला जानार नाही व तो अपात्र रण्यात येईल. ज्या अर्जदाराचे अर्ज पात्र ठरतील त्याच उमेदवाराची 100 गुणाची लेखी परीक्षा घेण्यात येईल.


error: Content is protected !!