Krushi Utpanna Bajar Samiti Bharti 2025 : चांगल्या वेतनाची नोकरी शोधताय? कृषी उत्पन्न बाजार समिती व्दारे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये कनिष्ठ लिपिक, नाईक (हेड प्युन), वॉचमन / शिपाई ही पदे भरली जात आहे. शैक्षणिक पात्रता 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीची अधिकृत जाहिरात कृषी उत्पन्न बाजार समिती द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक झाली दिली आहे.
Krushi Utpanna Bajar Samiti Bharti 2025 : Agricultural Produce Market Committee has published an advertisement to fill the vacant posts. In this recruitment, the posts of Junior Clerk, Naik (Head Peon), Watchman / Peon are being filled. Candidates with educational qualification 10th / 12th / Graduation will be able to apply.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : कृषी उत्पन्न बाजार समिती व्दारे ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
◾पदे : कनिष्ठ लिपिक, नाईक (हेड प्युन), वॉचमन / शिपाई.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 15000 ते 47,600 रूपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना मासिक वेतन दिले जाणार आहे. (प्रत्येक पदांचे मासिक वेतन वेगवेगळे आहे.)
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
◾वयोमर्यादा : दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 35 वर्षे आवश्यक आहे.
◾परीक्षा शुल्क : सर्व पदांकरिता रु. ७५०/- परीक्षा शुल्क (विना परतावा) अधिक १८% जी.एस.टी. (रु. १३५/-) असे एकूण रु. ८८५/-
◾एकूण पदे : 04 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾नोकरी ठिकाण : कृषी उत्पन्न बाजार समिती, आटपाडी जि. सांगली.
◾सर्व पदांकरिता ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल.
◾अर्ज करतांना उमेदवारांनी वैध असलेला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आय.डी. सक्रीय असला पाहिजे. तसेच गोबाईल क्रमांक हा (DND Activate) नसावा, संदेशवहनात येणाया तांत्रिक अडचणीमुळे एस.एम.एस किंवा ई मेल उमेदवारांपर्यंत पोहचू शकत नाही, त्याकरिता कृषी उत्पन्न बाजार समिती, आटपाडी जबाबदार राहणार नाही.
◾ऑनलाईन परीक्षेचे ठिकाण, दिनांक, परीक्षेचे माध्यम आणि अभ्यासक्रम बाबतची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
◾भरती प्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रम, कार्यक्रमातील बदल, सूचना वगैरे www.apmcatpadi.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील, उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून घेण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावयाची आहे. परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अंशतः बदल करणे याबाबतचे सर्व अधिकार सभापती / सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी यांना राहतील व या संदर्भातील त्यांचा निर्णय अंतिम राहील. याबाबत कोणासही कोणताही दावा करता येणार नाही.
◾उमेदवारांना अर्ज भरतांना काही अडचण किंवा शंका असल्यास संकेतस्थळावर दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून मदत घ्यावी.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 28 फेब्रुवारी 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.