Lekha koshagar Vibhag Bharti 2025 : महाराष्ट्र शासन अंतर्गत मुंबई व अधिनस्त जिल्हा कोषागार कार्यालय, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील गट-क संवर्गातील सरळसेवेने भरतीसाठी ऑनलाईन (Online) पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे. लेखा व कोषागारे विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, सहसंचालक, लेखा व कोषागारे, कोकण विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
Lekha koshagar Vibhag Bharti 2025 : Applications are being invited online for direct service recruitment in Group-C cadre in Mumbai and subordinate District Treasury Offices, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg under the Government of Maharashtra.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, सहसंचालक, लेखा व कोषागारे, कोकण विभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 29,200 ते 92,300 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली पहा.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 19 ते 43 वर्ष पर्यंत.
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾अर्ज सुरू : ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी १७.०० वाजल्यापासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.
◾पदाचे नाव : कनिष्ठ लेखापाल (गट-क).
◾इतर आवश्यक पात्रता : सांविधिक विद्यापिठाची कोणत्याही शाखेतील पदवी + तांत्रिक अर्हता मराठी टंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रतिमिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाचे ४० शब्द प्रति मिनीट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
◾एकूण पदे : 0179 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾परीक्षा शुल्क :
▪️अराखीव (खुला) प्रवर्ग : १०००/-
▪️राखीव प्रवर्ग : ९००/-, माजी सैनिक यांचेसाठी परीक्षा शुल्क माफ राहील.
◾नोकरी ठिकाण : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
◾अर्ज मराठी व इंग्रजीमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असला, तरी संगणक प्रक्रियेकरिता अर्ज इंग्रजीमध्ये भरणे आवश्यक आहे. संक्षिप्तपणे (Abbreviations) वा अद्याक्षरे (Initials) न देता संपूर्ण नाव व संपूर्ण पत्ता नमूद करावा. नावाच्या पत्त्याच्या दोन भागांमध्ये एका स्पेसने जागा सोडावी.
◾निवड प्रक्रियेत अंतिम निर्णय घेण्याचे सर्व अधिकार अध्यक्ष प्रादेशिक निवड समिती तथा सहसंचालक लेखा व कोषागारे, कोकण विभाग यांना असतील, सदर भरती प्रक्रिया ही मुंबई या जिल्हयाच्या संबंधित न्यायालयाच्या न्यायाधिकार कक्षेत असेल.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : ०६ मार्च २०२५ रोजी २३.५९ वाजेपर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.