महाराष्ट्र शासन : प्रयोगशाळा परिचर, शिपाई व इतर पदांची भरती! | पात्रता : 10वी उत्तीर्ण | मासिक वेतन : 15,000 ते 47,600 रूपये.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
(ऑनलाईन अर्ज 31
ऑक्टोंबर 2024
रोजी पासून सुरू
होतील.)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथे गट-ड (वर्ग-४) संवर्गातील पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये प्रयोगशाळा परिचर, शिपाई, मदतनीस, क्ष-किरण परिचर, शिपाई, प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, अपघात सेवक, बाह्य रुग्णसेवक, कक्ष सेवक ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण भरण्यात येणारी पदे ही 102 पदे आहेत. जे उमेदवार कोल्हापूर (Jobs in Kolhapur) मध्ये नोकरी शोधत असतील.त्यांना ही चांगली संधी आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या भरतीसाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता ही 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असावे. वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्ष, मागासवर्गीयांसाठी ४५ वर्षे असेल पाहिजे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज दिनांक 31 ऑक्टोंबर 2024 रोजी पासून सुरू होतील. पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल (कमी/ वाढ) होण्याची शक्यता आहे. पदसंख्येमध्ये बदल करण्याचा तसेच त्यानुषंगाने जाहिरामधील इतर बाबींमध्ये बदल करण्याचा अधिकार मा. जिल्हाधिकारी, कोल्हापुर तथा अध्यक्ष, जिल्हा निवड समिती व संस्थेचे अधिष्ठाता यांनी राखून ठेवलेला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल झल्यास याबाबतची घोषणा / सूचना वेळोवेळी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या घोषणा / सूचनांच्या आधारे प्रस्तूत परिक्षेमधून भरावयाच्या पदाकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. जाहिरातीची माहिती www.rcsmgmc.ac.in या लिंकवर उपलब्ध आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 नोव्हेंबर 2024 ही असणार आहे.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!