MAHA REAT Bharti 2024 : महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण (महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण) कार्यालयातील लिपिक, शिपाई, तांत्रिक सहाय्यक व इतर रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांनी विहित नमुण्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. 10वी, 12वी, आणि पदवीधर उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीरत केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
MAHA REAT Bharti 2024 : Applications are invited from eligible candidates in the prescribed format for filling up the posts of Clerk, Constable, Technical Assistant and other vacancies in the Maharashtra Immovable Property Appellate Tribunal Office.
◾भरती विभाग : महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण (महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government – महाराष्ट्र शासन) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : शिपाई, लिपिक, तांत्रिक सहाय्यक, लघुटांकलेखक व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ pdf जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 27,000 ते 50,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव व मासिक वेतन :
▪️शिपाई : २७,०००/- रुपये.
▪️वाहन चालक : २८,०००/- रुपये.
▪️कनिष्ठ लिपीक : ३६,०००/- रुपये.
▪️अभिलेखापाल : ४५,०००/- रुपये.
▪️लघुटंकलेखक : ४७,०३०/- रुपये.
▪️तांत्रिक सहायक : ४८,०००/- रुपये.
▪️माहिती तंत्रज्ञान अधिकारी (I.T. Officer) : ५०,०००/- रुपये.
▪️सहायक अधिक्षक : ५०,०००/- रुपये.
▪️अधिक्षक : ५५,०००/- रुपये.
▪️वित्त व लेखाअधिकारी : ७८,०००/- रुपये.
▪️निम्म श्रेणी लघुलेखक : ६५,०००/- रुपये.
▪️स्वीय सहायक : ९०,०००/- रुपये.
▪️खाजगी सचिव : १,१०,०००/- रुपये.
◾भरती कालावधी : रिक्त पदे कत्राटी तत्वावर (११ महिण्याकरिता) भरण्यासाठी ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️खाजगी सचिव : पदवीधर + टायपिंग कौशल्य + MSCIT उत्तीर्ण.
▪️ वैयक्तिक सहाय्यक : पदवीधर + टायपिंग कौशल्य + MSCIT उत्तीर्ण.
▪️ कनिष्ठ लघुलेखक : पदवी + टायपिंग कौशल्य + MSCIT उत्तीर्ण.
▪️ वित्त आणि लेखाधिकारी : पदवीधर असणे आवश्यक आहे.
▪️अधीक्षक : पदवीधर असणे आवश्यक आहे.
▪️सहाय्यक अधीक्षक : पदवीधर असणे आवश्यक आहे.
▪️माहिती तंत्रज्ञान अधिकारी : विज्ञान पदवी (संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान).
▪️तांत्रिक सहाय्यक : विज्ञान पदवी (संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान).
▪️स्टेनोग्राफर : पदवी + टायपिंग कौशल्य + MSCIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️रेकॉर्ड कीपर : पदवीधर उत्तीर्ण असणे.
▪️कनिष्ठ लिपिक : पदवी + टायपिंग कौशल्य + MSCIT उत्तीर्ण असणे.
▪️ड्रायव्हर : १२वी पास असणे आवश्यक आहे
▪️शिपाई : १२वी पास असणे आवश्यक आहे.
◾रिक्त पदे : 024 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : मुंबई येथे नियुक्ती दिली जाईल. (Jobs in Mumbai)
◾मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे शैक्षणिक अर्हता, अनुभव, टंकलेखन, संगणक याबाबतच्या प्रमाणपत्राच्या प्रमाणित सत्य व स्पष्ट प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे अन्यथा अर्ज बाद ठरविण्यात येतील याची अर्जदारांनी नोंद घ्यावी.
◾अर्जदाराने आपले अर्ज पोस्टाने, कुरीअर किंवा वैयक्तिक दिः २३/१०/२०२४ पर्यंत कार्यालयीन वेळेत आपले अर्ज पाठवावे व त्या तारखेनंतर येणारे अर्ज ग्राहय धरले जाणार नाही आणि ते बाद ठरविण्यात येतील.
◾अर्ज पाठविताना अर्जदाराने पाकीटावर कोणत्या पदासाठी अर्ज करित आहे हे ठळक अक्षरात लिहावे.
◾निवड झालेल्या उमेदवारांची सुरूवातीची नियुक्ती ही ११ महिण्याच्या कालावधीकरिता असेल तदनंतर उमेदवारांच्या कामाची गुणवत्ता आणि उरक्त पाहूनच उमेदवारास पूढील कालावधीकरिता म्हणजे 2 वेळा ११-११ महिण्याची पूनःनियुक्ती कंत्राटी तत्वावर देण्यात येईल.
◾महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधीकरण, मुंबई मधील कार्यरत कर्मचारी योग्य त्या पदास आणि पात्रतेनुसार अर्ज सादर करू शकतात.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 23 ऑक्टोबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रबंधक, महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण, पहिला मजला, वन फोर्ब्स इमारत, डॉ. वि बी गांधी रोड, काला घोडा, फोर्ट, मुंबई ४००००१.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.