Mahakosh Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागारे विभाग अंतर्गत प्रादेशिक विभागातंर्गत सहसंचालक कार्यालय, पुणे, कोषागार कार्यालय, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर कार्यालयातील असलेल्या रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीची अधिकृत जाहिरात लेखा व कोषागारे विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
Mahakosh Bharti 2025 : Applications are invited from eligible candidates through online mode only for appointment to the vacant posts in the Joint Director's Office, Pune, Treasury Office, Pune, Satara, Sangli, Solapur and Kolhapur offices under the Regional Division under the Accounts and Treasury Department of the Government of Maharashtra.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : लेखा व कोषागारे विभाग व्दारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾भरती प्रकार : महाराष्ट्र शासनच्या मोठ्या सरकारी विभागांत नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 29,200 ते 92,300 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, अधिक माहिती व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकणार आहेत.
◾वयोमर्यादा : उमेदवारांचे वय १९ वर्षापेक्षा कमी नसावे. खुल्या वर्गातील व्यक्तिसाठी ३८ वर्षे व मागासवर्गीय व्यक्तिसाठी ४३ वर्षे.
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : कनिष्ठ लेखापाल. (Junior Accountant)
◾आवश्यक पात्रता :
(१) शैक्षणिक अर्हता : सांविधिक विद्यापिठाची कोणत्याही शाखेतील पदवी.
(२) तांत्रिक अर्हता : मराठी टंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रतिमिनीट किया इंग्रजी टंकलेखनाचे ४० शब्द प्रति मिनीट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
◾एकूण पदे : 75 पदे भरली जात आहेत.
◾नोकरी ठिकाण : पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर कार्यालयातील.
◾ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी : दि. 31 डिसेंबर 2024 रोजी ते 30 जानेवारी 2025 पर्यंत.
◾आवश्यकतेनुसार वरील वेळापत्रकात बदल झाल्यास त्याबाबत वेळोवेळी https://mahakosh.maharashtra.gov.in/ या संकेस्थळावर सूचना प्रसिध्द करण्यात येतील. अशा सूचनांचे वेळावेळी अवलोकन करण्याची उमेदवारांनी दक्षता घ्यावयाची आहे.
◾या भरती संदर्भात अर्ज स्वीकारण्याची पध्दत, आवश्यक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, परीक्षेचे स्वरुप, परीक्षा शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया याबाबतचा सविस्तर तपशील दिनांक २६.१२.२०२४ रोजी https://mahakosh.maharashtra.gov.in/ सर्वसाधारण सूचना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याचे कृपया अवलोकन करावे. भरती प्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रम, कार्यक्रमातील बदल, सूचना वगैरे https://mahakosh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर वेळोवळी प्रसिध्द करण्यात येतील.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.